नवनीत राणा यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Navneet Rana Death threat | अमरावतीच्या खासदार नवनीत राणायांच्या बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राणा (Navneet Rana Death threat) यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी आता नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, धमकीचे फोन कॉल करणाऱ्या इसमा विरुद्ध कलम 354 A,354 D,506 (2), 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा (Navneet Rana Death threat) यांना एका विदेशी फोन नंबरवरुन व्हॉट्सअॅपला एक ऑडिओ क्लीप आली होती. या क्लीपमध्ये नवनीत राणा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तीन मिनिटांच्या या ऑडिओ क्लीपमुळे खळबळ उडाली आहे.

या क्लीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नावे देखील घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भारताला धमकी देण्यात आल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणी आता अधिक तपास केला जात आहे. याबाबत नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावरच निशाणा साधला आहे.

रवी राणा यांचा असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा

असदुद्दीन ओवैसी यांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीच रवी राणा यांनी केली आहे. मागे, लोकसभेमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे रवी राणा यांनी या धमकीच्या कॉलशी त्यांची काय लिंक आहे, याबाबत चौकशीची मागणी केली आहे.

नवनीत राणा (Navneet Rana Death threat) यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑगस्ट 2023 मध्ये देखील त्यांना धमकी देण्यात आली होती. तेव्हा महाराष्ट्र पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा त्यांना धमकी देण्यात आली आहे.

News Title : Navneet Rana Death threat

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना झटका

चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टींमुळे बदलेल नशीब

पाकिस्तानी खेळाडूचे लाजिरवाणे कृत्य; इटलीत चोरी करून फरार!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!