मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना झटका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) लढा देत आहेत. काही दिवसांपासून ते आता सगेसोयरेबाबत अंमलबजावणी करा अशी सरकारकडे मागणी करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्र दौरे करायला सुरूवात केली आहे. ते सोमवारी सकाळी सोलापूरमध्ये मराठा बांधवांशी बोलत होते आणि त्यानंतर ते रात्री नांदेडमध्ये गेले होते.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सोमवारी सोलापूर येथील बार्शीमध्ये गेले असून त्यानंतर ते रात्री नांदेडमध्ये गेले असता, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. नांदेडमध्ये चांदोजी पावडे मंगलकार्यालयामध्ये आले असता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नांदेडमध्ये रात्री 11.30 वाजता आले होते. चांदोजी पावडे मंगलकार्यालयामध्ये आले असता फटाक्यांच्या आतिषबाजीत त्याचं स्वागत करण्यात आलं. ध्वनीक्षेपकाचा आवाज रात्रभर सुरू ठेवल्याने (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं असून ही सभा रात्री साडे बारा वाजता संपली. ही सभा घेण्यास कोणतीही परवानगी मनोज जरांगे पाटील यांनी घेतली नसल्याने आयोजक आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि रात्री ध्वनीक्षेपकाचा आवाज आवाक्याबाहेर सोडल्याच्या कलमान्वये आयोजक आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला असला तरीही मनोज जरांगे यावर कोणती भूमिका घेणार. तसेच हा गुन्हा नेमका कोणी केला आहे. तसेच यामागे काही राजकारण आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

News Title – Manoj Jarange Patil News Update

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात

घटस्फोटानंतर सानिया मिर्झा जगतेय ‘असं’ आयुष्य, पाहा फोटो

“तुम्ही सरकारकडे काही मागू नका…”; नाना पाटेकर स्पष्टच बोलले

नात्यात दुरावा निर्माण व्हायचं ‘हे’ ठरू शकतं सर्वांत मोठं कारण!