“शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे”

Amit Shah | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. प्रत्येक पक्ष राज्यभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसून आहे. भाजपचे नेते अमित शहा (Amit Shah) यांची जळगावमध्ये सभा पार पडली आहे. यावेळी अमित शहा (Amit Shah) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

शहांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल 

अमित शहा (Amit Shah) यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. शरद पवार यांना गेली 50 वर्षांपासून लोकं सहन करत आहेत. 50 वर्षांचं सोडा त्यांनी पाच वर्षांचा हिशोब द्यावा, असा हल्ला अमित शहा (Amit Shah) यांनी केला असून मोदींना आता 400 जागांवर विजयी करा, असं अमित शहा म्हणाले.

“सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचंय”

अमित शहा बोलत असताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीप्पणी केली आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे. त्यानंतर शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना मुलगा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे, असं शहा म्हणालेत. त्यानंतर अमित शहा यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेनंतर अमित शहा यांनी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यावरही हल्ला केला आहे. सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाच्याला मुख्यमंत्री करायंचं आहे. तुमच्यासाठी कोणीच नाही पण तुमच्यासाठी मोदी आहेत, असं अमित शहा म्हणाले.

“रामलल्ला 70 वर्षे तंबुत”

काँग्रेसने लालचेत देशाच्या संस्कृतीला मागे ठेवलं आहे. या देशात राम मंदिर अधीच व्हायला हवं होतं. व्होट बँकेच्या भितीने रामलल्ला 70 वर्षे तंबुत होते, मोदींनी भव्य मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठा केली, असं अमित शहा म्हणाले आहेत.

त्यानंतर बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. राज्यामध्ये तीन चाकी रिक्षा आहे. या रिक्षाचे तिन्ही चाके पंक्चर आहे असा टोला अमित शहा यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा विकास करतील, असं अमित शहा म्हणाले.

 News Title – Amit Shah Aggressive On Sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात

घटस्फोटानंतर सानिया मिर्झा जगतेय ‘असं’ आयुष्य, पाहा फोटो

“तुम्ही सरकारकडे काही मागू नका…”; नाना पाटेकर स्पष्टच बोलले

नात्यात दुरावा निर्माण व्हायचं ‘हे’ ठरू शकतं सर्वांत मोठं कारण!