मोठी बातमी | पुणे ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Drugs News | पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र या पुणे शहरामध्ये गेली अनेक दिवसांपासून ड्रग्ज रॅकेट (Pune drugs news) सुरू असलेलं कळतंय. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे शहर (pune drugs News) हादरून गेलं आहे. यामुळे पुणे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

11 ड्रग्ज माफिया ताब्यात

पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरणाबाबत (Pune Drugs News)आता मोठी अपडेट समोर आली आहे. याचं कनेक्शन हे केवळ पुण्यातच नसून पुणे शहराच्या बाहेर आहे. मध्यंतरी कुरकुंभ एमआयडीसी येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उभारण्यात आला होता. याप्रकरणी आता पुण्यातून 11 ड्रग्ज माफियांना (Pune Drugs News) पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तर दुसरीकडे ईडीनं याबाबत तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. पुणे पोलिसांना ईडीनं पत्र दिलं असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता ईडी याप्रकरणी कसून चौकशी करेल. दरम्यान याप्रकरणी पुणे पोलिसांनी तब्बल 3500 कोटींचं ड्रग्ज ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली.

ड्रग्ज प्रकरणात ईडीची उडी

ड्रग्ज प्रकरणामध्ये ईडीने उडी घेतली आहे. या ड्रग्ज प्रकरणामध्ये ईडीने ड्रग्ज माफियांविषयी माहिती मिळवण्याचं काम केलं आहे. त्यांच्या संपत्तीबाबत पुणे पोलिसांकडून माहिती ईडीने मिळवली आहे. यामुळे आता ड्रग्ज माफियांची चौकशी ईडीच्या माध्यमातून होणार आहे. ईडीचं पत्र हे पुणे पोलिसांना मिळालेलं आहे.

या ड्रग्ज प्रकरणाचा थेट संबंध हा केवळ महाराष्ट्राशी नसून देशभरात सुरू असलेल्या ड्र्ग्ज रॅकेटशी आहे. आतापर्यंत साडे तीन हजार कोटींचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत आता आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

ईडीने देखील याप्रकरणामध्ये आपली भूमिका बजावली आहे. यामध्ये ड्रग्जची विक्री करत कशाप्रकारे पैशांची देवाण घेवाण करण्यात आली आहे का? याबाबत सर्व माहिती ईडी समोर आणणार असल्याची शक्यता आहे.

News Title – Pune Drugs News Update

महत्त्वाच्या बातम्या