सकाळी उपाशी पोटी Coffee पिणं ठरू शकतं अत्यंत धोकादायक!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Health Tips | अनेकांची सकाळ कॉफीशिवाय अपूर्ण असते. कॉफी पिल्यानंतरच त्यांना फ्रेश वाटतं. मात्र अनेक अभ्यासातून असे दिसून आलं आहे की, रिकाम्या पोटी कॉफी पिणे (Health Tips) शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

रिकाम्या पोटातील कॉफी अपचनाला चालना देऊ शकते आणि पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो. या सवयीमुळे कॉर्टिसॉलची पातळी वाढते. ज्यामुळे तणाव वाढू शकतो.

कॉफी तुम्हाला दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने राहण्यास मदत करते हे सिद्ध झाले असले तरी, जेव्हा तुम्ही कॉफी रिकाम्या पोटी प्याल तेव्हा त्याचे काही दुष्परिणाम देखील होतात. याबाबत अनेक संशोधन करण्यात आले आहे.

अस्वस्थ वाटू शकते

कॅफिन हे एक उत्तेजक असून ते शरीराची उर्जा पातळी वाढवते. मात्र, रिकाम्या पोटी हे कॅफिन घेतल्याने त्याचे परिणाम वाढू शकतात, ज्यामुळे चिंता, अस्वस्थता आणि तणाव वाढतो. यामुळे तुमची बेचैनी वाढू शकते.

अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो

कॉफीमध्ये अॅसिड असते आणि ते रिकाम्या पोटी सेवन केल्यास पोटातील अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. कॅफीन आणि अॅसिडच्या पातळीचे संयोजन यामुळे छातीत जळजळ आणि मळमळ झाल्यासारखं तुम्हाला वाटेल.

कमकुवत प्रतिकारशक्ती

कॅफिन (Health Tips ) शरीरात कॉर्टिसॉल (स्ट्रेस हार्मोन) उत्तेजित करते. त्याच्या उच्च पातळीचे आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. यामुळे कमकुवत प्रतिकारशक्ती, वजन वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

ब्लड शुगर कमी-जास्त होऊ शकतो

रिकाम्या पोटी कॉफी पिली तर (Health Tips ) रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास रक्तातील साखरेमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. यामुळे तुमच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.

News Title –  Health Tips for Coffee drinkers
महत्त्वाच्या बातम्या-

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; वाढत्या ट्रॅफिकमुळे मोठा निर्णय

इमरान हाश्मी आणि मौनी रॉयचा किसिंग सीन चर्चेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“…ती चूक असेल तर 10 वेळा मला पक्षात येण्यासाठी निरोप का पाठवता?”

अभिनेत्री राणी मुखर्जीची मुलगी पहिल्यांदाच आली समोर, क्यूट व्हिडीओ होतोय व्हायरल

अमोल कोल्हेंचा अजित पवारांबाबत मोठा खुलासा!