“मोदी-शहा महाराष्ट्रामध्ये येऊन मनोरंजन करतात”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Modi Shah | राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजपचे अध्यक्ष अमित शहा (Modi Shah) राज्याचे दौरे करताना दिसत आहेत. जळगावमध्ये अमित शहा यांनी सभा घेतली होती. यावेळी अमित शहा यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी कलम 370 बाबतही भाष्य केलं होतं. यावर आता मोदी-शहा (Modi Shah) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

मोदी शहा (Modi Shah) हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये येत सभा घेत आहेत. यावर आता संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. मोदी शहा महाराष्ट्रामध्ये येऊन मनोरंजन करतात. त्यांना वाटतं लोकं टाळ्या वाजवतात पण लोकं त्यांना एन्जॉय करतात, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदी शहा (Modi Shah) यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

कधी मोदी येतात, तर कधी शहा येतात अन् जनतेचं मनोरंजन करतात. कलम 370 काढलं त्याबाबतही शिवसेनेने पाठिंबा दिला होता. 370 कलम हटवून काय दिवे लावले आहेत. आजही हजारो काश्मीर पंडित निर्वासित आहेत. तुम्हाला त्यांचा आक्रोश दिसत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे असा हल्ला करत संजय राऊत कडाडले.

तुम्ही सर्जिकल स्ट्राईकबाबत खोटं बोलला. 2-4 लष्करी जवान शहिद होतायत. काश्मीरी मुलं अजूनही अस्वस्थ आहेत. अखंड हिंदुस्तान करू अशी घोषणा केली काय. पुलवामा घडवले गेले, शहिदांचा बाजार मांडला, त्यामुळे तुम्हाला लाज कशी वाटली नाही, असा हल्ला संजय राऊत यांनी केला आहे.

“छत्रपती संभाजीनगरवर आमचीच जागा”

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना सोबत घेतलं. त्यामुळे अमित शहा यांचे आभार असं संजय राऊत म्हणाले. छत्रपती संभाजीनगरची जागा खऱ्या शिवसेनेची असून जिंकणारी शिवसेना ही खरी शिवसेना आहे, असं संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून टोला लगावला आहे.

शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून वाद आहे. शिवसेना आणि काँग्रेस कोल्हापूरच्या जागेवर दावा करत आहेत. मात्र यावर संजय राऊत म्हणाले की शिवसेना अनेक वर्षांपासून कोल्हापूरमध्ये विजयी होत आहे, म्हणून कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

News Title – Modi Shah Entertainer

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानी खेळाडूचे लाजिरवाणे कृत्य; इटलीत चोरी करून फरार!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!

मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले