“बारामतीची ओळख शरद पवार साहेबांमुळे, म्हणून…”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Yugendra Pawar | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर आता शरद पवार यांचे पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षावर दावा केला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांचं असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये उभी फूट पडली आहे. अशातच शरद पवार यांचे नातू  युगेंद्र पवार (Yugendra Pawar) शरद पवारांसोबत बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये जात भेट देत आहेत.

युगेंद्र पवारांचा शरद पवारांना पाठिंबा

शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आता उभी फूट पडली. पवार कुटुंब हे शरद पवार यांच्या बाजूने आहे. यामध्ये आता अजित पवार यांचे बंधू श्रीनीवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आता आपले आजोबा शरद पवार यांच्यासोबत आहेत. युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला असून आता युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे शरद पवार यांच्यासोबत दौऱ्यावर आहेत.

काही दिवसांआधी युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलत असताना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, मी सध्या विद्याप्रतिष्ठानचं काम पाहतो. मी व्यवसायिक असून सध्या बारामती कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे, असं युगेंद्र पवार म्हणाले.

बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार हे ग्रामीण भागामध्ये जात मतदारांना भेट देत आहेत. आता शरद पवार यांच्यासोबत त्यांचे नातु युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ दिली आहे. यावेळी बोलत असताना युगेंद्र पवार म्हणाले की मी काही राजकारणामध्ये नाही. मी उद्योग क्षेत्रामध्ये काम करत आहे. बारामतीचे नाव हे शरद पवार साहेबांमुळे आहे, असं युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

“बारामतीची ओळख शरद पवार साहेबांमुळे”

आज आपण भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये गेल्यावर बारामती हे नाव सांगितल्यावर शरद पवार यांचं गाव म्हणून लोकं ओळखतात अशी ओळख आहे. त्यामुळे आता सर्वात जास्त साहेबांना सपोर्ट देण्याची गरज आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांना साथ देण्यासाठी आपल्या नातवाने आपल्या आजोबांना मोठा आधार दिला आहे. बारामतीमध्ये दहशतवाद निर्माण होत असेल तर मला सांगा असं युगेंद्र पवार यांनी जनतेला आश्वासन दिलं होतं. त्यांचा रोष हा अजित पवार यांच्यावर होता.

News Title – Yugendra Pawar With Sharad pawar At Baramati Assembly Election

महत्त्वाच्या बातम्या

सकाळी उपाशी पोटी Coffee पिणं ठरू शकतं अत्यंत धोकादायक!

पुणे ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर!

“शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे”

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना झटका

चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टींमुळे बदलेल नशीब