सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

Sourav Ganguly | भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेला त्यांच्या एका भेटीने बळ दिल्याचे दिसते. कारण गांगुलींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांनी ममता बॅनर्जी यांची नबन्ना येथील कार्यालयात भेट घेतली. यानंतर बंगालच्या राजकीय वर्तुळात गांगुली यांची चर्चा रंगली आहे. माहितीनुसार, सौरव गांगुली यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली.

ममता बॅनर्जी आणि सौरव गांगुली यांच्यात ही भेट लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी झाली. मात्र, सौरव गांगुलींनी राजकारणात येणार की नाही हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सौरव गांगुली ममता बॅनर्जींसोबत गुंतवणूकदार समिटसाठी स्पेनला गेले होते.

मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

गांगुली तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु माजी क्रिकेटपटूने या अटकळांचे खंडन केले होते. सौरव गांगुली म्हणाले होते की, मी एक सामान्य व्यक्ती आहे, आमदार किंवा खासदार नाही, मला राजकारणाशी कसलीही ओढ नाही.

सौरव गांगुलींनी गेल्या महिन्यात बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांची भेट घेतली होती. दोघांची ही भेट सॉल्ट लेक येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये झाली. संदेशखळीच्या मुद्द्यावरून भाजपच्या आंदोलनाचे नेतृत्व करताना सुकांत मजुमदार जखमी झाले. योगायोगाने सौरव गांगुलींच्या आईलाही कोलकात्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

Sourav Ganguly अन् राजकारणी

आपल्या आईला भेटायला आलेल्या सौरव यांनी सुकांत मजुमदार यांचीही भेट घेतली. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीनंतर बंगालच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विविध प्रकारच्या अटकळांना सुरुवात झाली. अशातच सुकांत यांच्यानंतर आता सौरव गांगुलींनी ममता बॅनर्जींची भेट घेतली आहे.

2022 मध्ये जेव्हा गृहमंत्री अमित शाह सौरव गांगुलींच्या कोलकाता येथील निवासस्थानी पोहोचले होते, तेव्हा गांगुली आता भाजपमध्ये सामील होऊ शकतात, असे सांगितले जात होते. परंतु माजी क्रिकेटपटूनेही या अफवांचे खंडन केले होते. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. जर आपण गेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले तर, 2019 मध्ये ममता बॅनर्जींच्या टीएमसीने 22 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 18 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या.

News Title- Former Team India President Sourav Ganguly met West Bengal Chief Minister Mamata Banerjee
 महत्त्वाच्या बातम्या –

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी

“विचारपूर्वक बोला नाही तर…”, राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाच्या सूचना

मुंबई: अभिनेत्री जॅकलिनच्या इमारतीला रात्री भीषण आग; अंगावर काटा आणणारी दृश्ये