“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा नुकताच विवाहपूर्व सोहळा पार पडला. गुजरातमधील जामनगर येथे झालेल्या या सोहळ्याला जगभरातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हा सोहळा खूपच भव्य दिव्य होता. अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. अनंत-राधिकाच्या फंक्शनला संपूर्ण बॉलिवूड उपस्थित होते. अमिताभ बच्चनपासून ते सलमान खान, शाहरुख खानपर्यंत प्रत्येक मोठे स्टार या सोहळ्यात दिसले.

अंबानींच्या पार्टीत अनेक स्टार्सनीही परफॉर्म केले. मात्र, अभिनेत्री कंगना रनौत या विवाहपूर्व सोहळ्यात दिसली नाही. आता या अभिनेत्रीने अंबानींच्या पार्टीत डान्स करणाऱ्या कलाकारांची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लेख शेअर केला आहे. या लेखात लिहिले की, गायिका लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी कधीही पैशासाठी लग्नात परफॉर्म करणार नाही. त्याबद्दल त्यांचे कौतुक करताना कंगनाने अप्रत्यक्षपणे या सेलिब्रिटींवर ताशेरे ओढले.

बॉलिवूड कलाकारांवर टीकास्त्र

कंगनाने म्हटले की, मी अनेक आर्थिक समस्यांमधून गेले आहे. पण लताजी आणि मी असे दोनच लोक आहोत ज्यांनी पैशांसाठी कधीच परफॉर्म केले नाही. लताजी यांची गाणी प्रचंड हिट आहेत. मला कितीही पैशांचे आमिष दाखवले तरी मी लग्नसोहळ्यात कधीच नाचले नाही.

अनेक सुपरहिट गाणीही मला ऑफर झाली. मी अवॉर्ड शोपासूनही दूर झाले. लोकप्रियता आणि पैशाला नाही म्हणायला मजबूत चारित्र्य आणि प्रतिष्ठा लागते. शॉर्टकटच्या जगात, तरुण पिढीने हे समजून घेणे आवश्यक आहे की प्रामाणिकपणानेच पैसा कमावता येतो, असेही कंगनाने नमूद केले.

Kangana Ranaut पुन्हा चर्चेत

अभिनेत्री कंगना रनौतला तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाते. अनेकदा कंगना सोशल मीडियावर ट्रोल देखील होत असते. ती नेहमी काही ना काही कारणावरून चर्चेत असते. मागील काही कालावधीपासून तिने सातत्याने बॉलिवूडला लक्ष्य केले आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल भाष्य करायचे तर, कंगना नुकतीच तेजस या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्रीने एअरफोर्स पायलट तेजसची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 14 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

News Title- Actress Kangana Ranaut criticized Bollywood actors after they performed at Anant Ambani and Radhika Merchant’s pre-wedding function
महत्त्वाच्या बातम्या –

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायले खास गाणे, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी

“विचारपूर्वक बोला नाही तर…”, राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाच्या सूचना

मुंबई: अभिनेत्री जॅकलिनच्या इमारतीला रात्री भीषण आग; अंगावर काटा आणणारी दृश्ये

“बारामतीची ओळख शरद पवार साहेबांमुळे, म्हणून…”