प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपमध्ये पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये गेले काही दिवस जागा वाटपावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी याबाबत एक वक्तव्य केलं आहे.

“पण महाविकास आघाडी माझ्यासोबत नाही”

मुंबई येथील फोर सिझन्स हॉटेलमध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात बैठक झाली. यामध्ये प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेल्या वक्तव्याची राजकारणामध्ये चर्चा होऊ लागली आहे. मी महाविकास आघाडीसोबत आहे पण महाविकास आघाडी माझ्यासोबत नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केल्यानं राजकीय वर्तुळामध्ये मोठा ट्वीस्ट निर्माण होण्याची संभावना आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते होते. त्यापैकी सिद्धार्थ मोकळे यांनी प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य ऐकल्यानंतर आपली भावना व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलले वक्तव्य माझ्या मनाला लागलं आहे, असं सिद्धार्थ मोकळे म्हणाले आहेत.

कोणतीच चर्चा नाही

गेली अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणतीच चर्चा होत नाही. यापूर्वी अचर्चित राहिलेले मुद्दे बैठकी वेळी पुढे आणण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणावर देखील चर्चा झाली नाही.

ओबीसींना 15 जागा आणि अल्पसंख्यांक 3 उमेदवार दिले पाहिजेत असं वंचित बहुजन आघाडीने प्रस्ताव दिला आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांनी बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यानं भाजपमध्ये निवडणुकीनंतर प्रवेश करणार नाही अशी धारणा मांडली होती, मात्र त्यावरही सर्व नेते मौन धारण करत बसले आहेत, असं सिद्धार्थ मोकळे म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर अकोल्याची जागा द्यायला तयार

जागा वाटपांबाबत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक दिवसांपासून बैठक होत आहे. चर्चा देखील होताना दिसत आहेत. मात्र कोणताही तोडगा निघत नाही. यावर प्रकाश आंबेडकर यांनी मी अकोल्याची जागा देतो पुढं काय ते बोला, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मात्र यावर कोणीही काहीही बोललं नाही.

News Title – Prakash Ambedkar Meeting With mahavikas Aghadi

महत्त्वाच्या बातम्या

‘त्या खोलीत रात्रभर…’; अभिनेत्री करिना कपूरने करिश्माबद्दल केला सर्वात मोठा खुलासा

नवनीत राणा यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

“भारत माता की जय मान्य नाही”; ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

महाशिवरात्रीला महादेवाला करा ‘या’ वस्तू दान, आपल्या इच्छा आकांक्षा होतील सफल

डाळिंबाच्या रसाचे ‘इतके’ फायदे ऐकून तुम्हीही चकित व्हाल!