डाळिंबाच्या रसाचे ‘इतके’ फायदे ऐकून तुम्हीही चकित व्हाल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Benefits of Pomegranate Juice | आता उन्हाळा लागलाय. उन्हाचे चटके जाणवू लागल्याने आता प्रत्येक ठिकाणी फळ विक्रेते दिसून येत आहेत. रसवंती गृह तसेच फळांचा रस विकणारे स्टॉल दिसून येत आहेत. दुपारी बरेच जण नारळ पाणी पिण्यास अधिक पसंत करतात. फळांचा रस पिणे तर उत्तम आहेच यासोबतच फळे खाणेही (Benefits of Pomegranate Juice) फायद्याचे ठरते.

उन्हाळ्यात डाळिंब फळ बऱ्याच जणांना आवडतं. डाळिंब हे फळ आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. त्यातच डाळिंबाचा रस अत्यंत गुणकारी ठरतो. डाळिंबाचा रस केवळ स्वादिष्ट नसून आरोग्यासाठी अनेक फायद्यांनीही उपयुक्त आहे.

डाळिंब रसाचे फायदे ऐकून तुम्हीही चकित व्हाल. डाळिंबाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतात, हे अँटिऑक्सिडंट आपल्या शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. त्यामुळे त्वचेवर चमक येते.

डाळिंबाच्या रसाचे फायदे

डाळिंबाचा रस रोज घेतल्यास कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका ही कमी होतो. यासोबतच डाळिंबात पॉलीफेनॉल असतात जे हृदयाच्या आरोग्यास चालना देतात आणि डाळिंबाचा रस प्यायल्याने छातीत दुखणे कमी होते आणि हृदयरोगाशी संबंधित बायोमार्कर्स सुधारतात.

डाळिंबात अँटिऑक्सिडेंट एलागिटॅनिन असते, जे सूज कमी करण्यास मदत करते आणि मेंदूचे संरक्षण करते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, एलाजिटानिन्स ऑक्सिडेटिव्ह नुकसान (Benefits of Pomegranate Juice) कमी करून आणि मेंदूच्या पेशींचे अस्तित्व वाढवून अल्झायमर आणि पार्किन्सन रोगांपासून मेंदूचे संरक्षण करू शकते.

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी अधिक असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून देखील कामं करतं. असा हा फायद्याचा डाळिंबाचा रस नियमित प्यायलच हवा. याचे अनेक फायदे लवकर दिसून येतात. बरेच जण डाळिंबाच्या सालीचा चहा देखील पितात. तो देखील आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

News Title- Benefits of Pomegranate Juice

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानी खेळाडूचे लाजिरवाणे कृत्य; इटलीत चोरी करून फरार!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आठवली ‘देशभक्ती’, खेळाडूंना दिला गंभीर इशारा!

Facebook आणि Instagram डाऊन अन् मार्क झुकरबर्गचं मोठं नुकसान!

मुंबईकरांसाठी खुशखबर! CNG च्या दरात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

7 भारतीयांची फसवणूक! रशिया फिरायला गेलेल्या तरूणांना युक्रेनविरूद्धच्या युद्धात उतरवले