धक्कादायक! ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाची हत्या

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune Crime | ठाकरे गटाच्या पिंपरी-चिंचवड विभाग प्रमुखाच्या मुलाचा खून करण्यात आला आहे. त्याची निघृण हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील (Pune Crime) देहूरोड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Pune Crime)

विजय थोरी हे शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या मुलाची निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणामुळे थोरी कुटुंब शोकाकुल आहे. (Pune Crime)

उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख विजय थोरी यांचा 23 वर्षीय मुलगा विशाल थोरी मद्यधुंद अवस्थेत पडला होता. यावेळी आरोपी कपड्याचे दुकान बंद करत होता. त्यानंतर रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी लाकडी बांबू आणि कुंडीने मारहाण करण्यात आली. आरोपी आणि विशालचे पूर्वीपासून वाद असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे. (Pune Crime)

बावधनमध्येही महिलेची हत्या

बावधनमध्ये मोठा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केले असून त्या महिलेचा पती महेंद्र जैन यांच्यावर देखील वार केले आहेत. महिलेचं नाव हे आशा जैन असून महेंद्र त्यांच्यावर खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

या घडलेल्या प्रकरणानंतर हिंजवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र हे गंभीर जखमी आहेत. बावधन येथील विंड विल सोसायटीमध्ये आपल्या जावयासोबत आशा आणि महेंद्र राहत होते. यावेळी आशा या मृतावस्थेत आणि महेंद्र हे जखमी अवस्थेत दिसले, यावेळी महेंद्र यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

पुणे शहराच्या गुन्हेगारीत वाढ

पुणे शहरामध्ये गुन्हेगारीत वाढ होत असून मोठ्या प्रमाणात हत्या होताना दिसत आहे. पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवलं असलं तरीही हत्या, खून, खुनाच्या प्रयत्नात वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – Pune Crime News Update

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक, वाचा आजचं राशीभविष्य

टीईटी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर!

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

सकाळी उपाशी पोटी Coffee पिणं ठरू शकतं अत्यंत धोकादायक!

पुणे ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर!