महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीसांचं सर्वात मोठं वक्तव्य!

Devendra Fadnavis | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करण्यात व्यस्त आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप संदर्भात लागतार बैठका होत आहेत. तर दुसरीकडे महायुती म्हणजेच भाजपा, शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे तीन पक्ष मिळून यंदा लोकसभा लढतील. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबत चर्चा होत आहेत. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

महायुतीच्या जागावाटपाबाबत जी आकडेवारी समोर येत आहे त्यात अजित पवार गटाला 3 किंवा 4 जागा दिल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर शिंदे गटाला 8 जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भातच फडणवीस यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं वक्तव्य

महायुतीतील मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, असं स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासोबतच महाराष्ट्रातील जागेबाबत अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

“एक आकडी जागा मिळणार किंवा तितकेच मिळणार वगैरे, मला असं वाटतं की, अशाप्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत त्यांना आम्ही योग्य सन्मानाप्रमाणे जागा देऊ. मात्र, माध्यमात येणाऱ्या या बातम्या धादांत चुकीच्या आहेत. मिडियाने एवढ्या जागा मिळणार, तेवढ्या जागा मिळणार ते बंद केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

मविआत जागा वाटप संदर्भात बैठकांचं सत्र

पुढे ते म्हणाले की, आपण भाजपच्या पहिल्या यादीच्या वेळी बघितलं असेल की जिथे युती आहे. त्याठिकाणाची नावे यादीत आली नाहीत. कारण युतीतल्या पक्षांसोबत चर्चा करुन उमेदवार जाहीर करायचे असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांची देखील माहिती समोर येईल, असं फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

आता महायुतीमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट यांना किती जागा दिल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसोबत आता वंचितही लढणार आहे. त्यामुळे मविआमध्येही नेमक्या कुणाला किती जागा मिळणार, याबाबत चर्चा होत आहेत.

News Title-  Devendra Fadnavis big statement on the seat allocation of Mahayuti

महत्त्वाच्या बातम्या –

“एवढी मेहनत करूनही घराणेशाहीचा टॅग लावतात, अभिनय येत नाही असंही म्हणतात”

सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी