चाहत्यांना मोठा धक्का; RCB चा ‘हा’ खेळाडू खेळणार शेवटचा आयपीएल सीजन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | वर्ल्डकप नंतर सर्व क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2024) वेध लागले आहेत. आता आयपीएल सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यापुर्वीच एक मोठी बातमी क्रिकेट विश्वातून समोर आली आहे. यंदाचा सीजन काही खेळाडूंसाठी शेवटचा सीजन ठरणार आहे. त्यात आरसीबीच्या स्टार प्लेयरचंही नाव आहे.

हा प्लेयर दुसरा-तिसरा कोणी नसून दिनेश कार्तिक आहे. 38 वर्षीय कार्तिकचा आयपीएलमधील हा शेवटचा सीजन असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा देखील हा सीजन शेवटचा असणार आहे.

दिनेश कार्तिक खेळणार शेवटचा सीजन

खरं तर महेंद्र सिंह धोनी मागच्या सीजनमध्येच निवृत्ती घेणार होता. मात्र, अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्याने अजून एक सीजन खेळणार असल्याची घोषणा करत चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं होतं.

आता धोनीबरोबरच दिनेश कार्तिक देखील यंदाचा आपला शेवटचा आयपीएल सीजन खेळणार आहे. आयपीएलची (IPL 2024) सुरुवात 2008 मध्ये झाली, तेव्हापासून प्रत्येक सीजनमध्ये दिनेश कार्तिक खेळलाय. आयपीएल करिअरमध्ये दिनेश कार्तिक सहा वेगवेगळ्या फ्रेंचायजींकडून खेळला.

दिनेश कार्तिकच्या खेळीकडे सर्वांचंच लक्ष

त्यात दिल्ली कॅपिटल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि आरसीबी या टीमचा समावेश आहे. आयपीएल 2022 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला 5.50 कोटी रुपये देऊन आपल्या संघाचा एक महत्वपूर्ण भाग बनवलं. तसंच दिनेश कार्तिक हा भारतीय संघातील सर्वोत्तम T20 (IPL 2024)  फलंदाजांपैकी एक आहे.

दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 च्या सीजनमध्ये जबरदस्त खेळ दाखवला. फिनिशरचा रोल परफॉर्म करताना त्याने 183 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा चोपल्या. आता यंदाचा सीजन शेवटचा म्हटल्यावर तो कसा खेळणार, याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल.

News Title- Dinesh Karthik Set To End IPL Career After 2024 Season

महत्त्वाच्या बातम्या –

“एवढी मेहनत करूनही घराणेशाहीचा टॅग लावतात, अभिनय येत नाही असंही म्हणतात”

सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी