Mumbai Assembly Election 2024 | राज्यामध्ये भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे. मात्र अशातच अजून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून शंका उपस्थित होताना दिसत आहेत. याबाबत कालच महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली होती. मात्र जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. अशातच आता मुंबईतील पश्चिम उत्तर भागामध्ये याआधी बॉलिवूड अभिनेता गोविंदाने या विभागातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी तो विजयी झाला होता. (Mumbai Assembly Election 2024)
आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्यानं पश्चिम उत्तर मुंबई भागातून निवडणूक (Mumbai Assembly Election 2024) लढणार असल्याची इच्छा व्यक्त केली. मागील लोकसभा निवडणुकीला भाजप-शिवसेना एकत्र होते. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस होतं. दरम्यान, याठिकाणी शिवसेनेनं बाजी मारली होती. (Mumbai Assembly Election 2024)
सध्या राज्याचं राजकारण हे बदलत चाललं आहे. आता शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. मागील निवडणुकीला शिवसेनेचे गजानन किर्तीकर हे शिवसेनेतून निवडणूक लढले होते. मात्र आता शिवसेना फूटीनंतर ते शिंदे गटामध्ये गेले आहेत. यामुळे आता या जागेवर भाजपचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. (Mumbai Assembly Election 2024)
संजय निरूपम यांचा दावा
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून संजय निरूपम यांनी निवडणूक लढण्याबाबत दावा केला होता. मात्र आता काँग्रेसने दुसरंच नाव समोर आणलं. यामुळे आता संजय निरूपम काय भूमिका घेणार? हे पाहणं गरजेचं आहे.
हिंदी अभिनेता राजकारकारणात?
या मतदारसंघामध्ये हिंदी अभिनेते राज बब्बर निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज बब्बर देखील वर्सोवा मतदारसंघामध्ये राहतात, त्यामुळे राज बब्बर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीची जागा दिली जाईल अशी चर्चा आहे.
गजानन किर्तीकर हे सध्याचे खासदार आहेत. या मतदारसंघामध्ये संजय निरूपम यांनी या जागेवर निवडणुक लढण्यासाठी दावा केला आहे. त्यानंतर राज बब्बर यांचं देखील नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. या जागेवर अजूनही संभ्रम निर्माण आहे.
News Title – Mumbai Assembly Election 2024
महत्त्वाच्या बातम्या
चाहत्यांना मोठा धक्का; RCB चा ‘हा’ खेळाडू खेळणार शेवटचा आयपीएल सीजन
महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीसांचं सर्वात मोठं वक्तव्य!
धक्कादायक! ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाची हत्या
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!
बाळासाहेब थोरातांच्या मुलीची राजकारणात एन्ट्री; मिळाली मोठी जबाबदारी