चिकन प्रेमींनो सावधान; ‘या’ शहरात ‘बर्ड फ्लू’चा उद्रेक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bird Flu | महाराष्ट्र राज्यात ‘बर्ड फ्लू’चा उद्रेक झाल्याचं दिसून येतंय. नागपूरमधील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रा मधील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या काही दिवसांत अनेक कोंबड्यांचा मृत्यू (Bird Flu) झाला आहे. पोल्ट्री फार्ममधील तब्बल 2650 कोंबड्या दगावल्याने एकच खळबळ उडाली.

यामुळे पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन अधिक तपासणी केली. मृत्यूचे कारण समजावे म्हणून, आजारी कोंबड्यांचे नमुने हे पुणे आणि भोपाळ येथे पाठवण्यात आले होते. याच्या रिपोर्टमध्ये कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ म्हणजे एवियन इन्फ्लुएंजाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक

या कारणांमुळे संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या नंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागपूरमधील या कुक्कुटपालन केंद्रासाठी तातडीने निर्णय घेण्यात आला.

या केंद्रातील तब्बल 8 हजार 501 कोंबड्यांना मारण्याची प्रक्रिया केली गेली आहे. तसेच, 16 हजारांहून जास्त अंडीही (Bird Flu) नष्ट करण्यात आली आहेत. नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजूषा पुंडलिक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

साडेआठ हजार कोंबड्या मारण्याचे आदेश

राज्य शासनाच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राच्या एक किमी परिसरात असलेल्या पशुवैद्यकीय विद्यापीठातील कुक्कुटपालन केंद्रातही 260 कोंबड्यांना मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतर कुठल्याही कुक्कुटपालन केंद्रावर याचे संक्रमण (Bird Flu) झाले नाहीये.

बर्ड फ्लू हा आजार एवियन इन्फ्लुएंजा व्हायरस H5N1 मुळं होतो. माणसांमध्ये हा आजार कोंबड्यांमुळं किंवा बर्ड फ्लू झालेल्या पक्ष्यांच्या सानिध्यात आल्यामुळे होतो. आता नागपुरातील या घटनेमुळे सध्या तरी चिकन खाणे टाळावे, असं म्हटलं जातंय.

News Title- Bird Flu In Thousands Of Chickens In Nagpur 

महत्त्वाच्या बातम्या –

“एवढी मेहनत करूनही घराणेशाहीचा टॅग लावतात, अभिनय येत नाही असंही म्हणतात”

सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी