अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर!

Dharmendra | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रकृतीबद्दल सध्या चर्चा होत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात त्यांची प्रकृती खूपच खालावलेली दिसत होती. तेव्हापासून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा होत आहे.

आता धर्मेंद्र यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकतेच उदयपूरला एका लग्नसोहळ्यासाठी गेले असताना धर्मेंद्र यांच्या पाठीला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी असल्याचं कळतंय.

धर्मेंद्र गेल्या दोन आठवड्यापासून आजारी

धर्मेंद्र (Dharmendra) यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांचं आजारपण दिसून येत होतं. लग्नसोहळ्यात नाचताना त्यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली होती. तसंच थकवा आणि वृद्धापकाळामुळे दुखापतीचा त्यांच्यावर आणखी परिणाम झाल्याचं दिसून आलं.

मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या ठीक असून सध्या ते पूर्णपणे आरोग्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. वयोमानानुसार त्यांची तब्येत आता खूपच खालावलेली फोटोमध्ये दिसून येतेय. मागच्या आठवड्यात त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता.

चाहत्यांची चिंता वाढली

ज्यात धर्मेंद्र  शिळी भाकरी खाताना दिसत होते. या फोटोत त्यांचे केस विस्कटलेले आणि त्यांच्या पायाला प्लास्टरही दिसून आले. हा फोटो शेअर करत त्यांनी,”अर्धी रात्र झाली…झोप येत नाही..भूकही लागून जाते. मित्रांनो शिळ्या पोळीसोबत लोणी खूपच स्वादीष्ट लागते, हा हा”, असे कॅप्शन त्यांनी दिले होते.

या पोस्टनंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या प्रकृतीबद्दल सतत विचारणा केली जात होती. त्यामुळे काही तासातच त्यांनी ही पोस्ट डिलिट केली होती. अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या फिल्मी कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते लवकरच ‘अपने 2’ या चित्रपटात दिसणार आहेत. यापुर्वी त्यांनी ‘तेरी बातो में उलझा जिया’ या चित्रपटात काम केलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही ते दिसून आले होते.

News Title- Big update on actor Dharmendra health

महत्त्वाच्या बातम्या –

शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; पोलिस उपनिरीक्षक असल्याचं सांगत केलं धक्कादायक कृत्य

मुलगा अनंत अंबानीचं हृदयस्पर्शी भाषण; ‘बापमाणूस’ मुकेश अंबानींना अश्रू अनावर!

“…तर अडचणी वाढणारच”, शतक झळकावताच शार्दुलने सांगितली BCCI ची मोठी चूक!

…म्हणून नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; लालू यादव यांची पंतप्रधानांवर सडकून टीका