‘तो माणूस फडणवीसांचा….’; जरांगे पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा राज्यभर सभा घेण्यासाठी दौरा सुरु केला आहे. सरकारने मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र दिलं आहे. मात्र, ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे बैठक घेत चर्चा करत आहेत. दरम्यान, अंतरवाली येथे बोलत असताना जरांगेंनी अॅड गुणरत्न सदावर्तेंवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा धरला.

काय म्हणाले जरांगे?

गेल्या काही दिवसांपासून जरांगे (Manoj Jarange Patil) आक्रमक होऊन सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, आज (07 मार्च) रोजी अंतरवाली सराटीमध्ये बोलत असताना जरांगेंनी फडणवीस आणि सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली. या वेळी जरांगे म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते आणि कोर्टाबद्दल मला अधिकृत काही माहिती नाही. परंतु गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा माणूस आहे. गुणरत्न सदावर्ते यांना बळ मिळणार ते पुन्हा कोर्टात जाणार आहेत. फडणवीस साहेब पुन्हा जा म्हणणार, हे त्यांचं सुरूच राहणार आहे.

जरांगेंचा राज्यभर दौरा-

मराठा समाजाल 10 टक्के आरक्षण मिळण्यापूर्वी जरांगेंनी (Manoj Jarange Patil) राज्यभर दौरे करत सभा घेतल्या होत्या. राज्याच्या गावागावत जाऊन जरांगेंनी भाषणं करत सभा घेतल्या त्यांच्या सभेला लाखो लोकांनी पाठिंबा दिला. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंनी सरकारला केली. दरम्यान, सराकरने यावर कोणता ठोस निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी उद्यापासून दौऱ्यावर जाणार आहेत. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात संवाद बैठका घेऊन मराठा समाजाशी संवाद साधणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

आंदोलन सुरुच राहणार-

सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मराठा बांधवांच्या आग्रहाखातर आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

News Title : manoj jarange patil criticized gunaratna sadavarte

महत्त्वाच्या बातम्या-

चिकन प्रेमींनो सावधान; ‘या’ शहरात ‘बर्ड फ्लू’चा उद्रेक

मुंबईतून काँग्रेसमधून लढणार हिंदी अभिनेता, मतदारसंघ जाहीर झाला?

चाहत्यांना मोठा धक्का; RCB चा ‘हा’ खेळाडू खेळणार शेवटचा आयपीएल सीजन

महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीसांचं सर्वात मोठं वक्तव्य!

धक्कादायक! ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखाच्या मुलाची हत्या