गुड न्यूज! ‘पुष्पा 2’ मध्ये होणार बॉलिवूडमधील ‘या’ सुपरस्टारची एंट्री

Pushpa 2 | बॉलिवूडमधील अभिनेता संजय दत्त आता साऊथ स्टार अल्लू अर्जुनला टक्कर देणार आहे. लवकरच अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) हा चित्रपट येणार आहे. यामध्ये मनोज बाजपेयीची वर्णी लागल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता यात बॉलिवूड स्टार संजय दत्त झळकणार असल्याची माहिती मिळत आहे.

काही रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटात संजय दत्तची वर्णी लागली आहे. या चित्रपटात संजय दत्तचा कॅमिओ असणार आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये. पण चाहते या चित्रपटासाठी आतुर आहेत.

संजय दत्त ‘पुष्पा 2’ मध्ये दिसणार

रॉकिंग स्टार यशच्या ‘KGF Chapter 2’ मध्ये संजय दत्त दिसून आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. त्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. आता ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 ) मधली संजयची भूमिका कशी असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अल्लू अर्जुनच ‘पुष्पा 2’ हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहता येणार आहे. दोघेही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहेत.

‘या’ तारखेला रिलीज होणार ‘पुष्पा 2’

“तुम्हाला ‘पुष्पा 2’ मध्ये पुष्पा हा पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. पुष्पाच्या पहिल्या पार्टपेक्षा यंदा तुम्हाला अधिक नावीन्यता दिसणार आहे. यात तुम्हाला नक्कीच आनंद येईल”, असं एक मुलाखतीमध्ये अल्लू अर्जुन म्हणाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

चित्रपटातील अल्लू अर्जुनचे अनेक लुक समोर आले आहेत. त्यामुळे चाहत्यांची चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे. त्यातच यामध्ये संजय दत्त दिसणार म्हटल्यावर चाहते अजूनच उत्साही झाले आहेत. त्यामुळे सध्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 ) चीच चर्चा होत आहे.

News Title- Sanjay Dutt will be seen in the Pushpa 2

महत्त्वाच्या बातम्या –

“एवढी मेहनत करूनही घराणेशाहीचा टॅग लावतात, अभिनय येत नाही असंही म्हणतात”

सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी