मोठी बातमी! सागर बंगल्यावर सुप्रिया सुळे आणि फडणवीसांची भेट?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule | गेल्या काही दिवसांपासून बारामतीत नमो रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अधिक चर्चा झालेली पाहायला मिळाली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता (Supriya Sule) सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर भेट झाली असल्याची चर्चा आहे. याबाबत आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्पष्टीकरण दिलंय.

सुळे आणि फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट?

सुप्रिया सुळे आणि फडणवीस यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी सागर बंगल्यावर भेट झाली असल्याचं बोललं जात आहे. यापार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आपलं मत मांडलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीस यांची भेट घेतली नसल्याचं सांगितलं आहे.

आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे या बारामतीच्या लाटेगावमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर त्या लगेचच मुंबईकडे निघाल्या. त्यांना मुंबईकडे जाताना टोल देखील काढावा लागला. माझ्याकडे टोल काढल्याच्या पावत्या आहेत. त्यानंतर मी सिल्वर ओकला गेली असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अर्थातच सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांची भेट घेतली नसल्याचं सांगितलं.

सिल्वर ओकला आम्ही रात्री 2.30 मिनिटांनी पोहोचलो. तरीही आपल्याला भेट झाली असं वाटत असेल तर सिल्वर ओकचे कॅमेरे तपासू शकता, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अमित शहांवर ताशेरे

गेल्या काही दिवसांपासून शहा आणि मोदी राज्यामध्ये दौरे करत आहेत. अमित शहा यांची काही दिवसांआधी जळगावमध्ये सभा झाली. सभेमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. त्यापार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांच्यावर हल्ला केला आहे. भाजप हे ईस्ट इंडिया कंपनीसारखे पक्ष फोडत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर अमित शहा यांनी एक चकार शब्द काढला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

आमच्यावर एवढी टीका केली असली तरीही आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, या गोष्टीचं मला बरं वाटलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

News Title – Supriya Sule And devendra Fadanvis meet At sagar Bunglow

महत्त्वाच्या बातम्या

“एवढी मेहनत करूनही घराणेशाहीचा टॅग लावतात, अभिनय येत नाही असंही म्हणतात”

सौरव गांगुलीची राजकारणात एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, 30 मिनिटे चर्चा!

“मी आर्थिक समस्येचा सामना केला पण पैशासाठी कधीच…”, कंगनाचा संताप

“अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी गायलं खास गाणं, Video

सचिनला बिग बॉस विजेता मुनावर फारुकीने केलं आऊट; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी घेतली फिरकी