महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम? या दिवशी होणार अंतिम निर्णय; बावनकुळेंचं मोठं विधान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lok Sabha Election | लोकसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण, अद्याप महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव समोर आलेले नाही. महाविकास आघाडीमध्ये देखील जागावाटपावरून सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मविआसोबत लोकसभा लढणार का याकडे राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे. 9 तारखेला यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मविआच्या नेत्यांनी आंबेडकरांना किती जागा हव्यात याबद्दल स्पष्ट विचारणा केली.

मविआसोबतच्या नेत्यांसोबतची प्रकाश आंबेडकरांची बैठक सकारात्मक झाल्याचे कळते. दुसरीकडे महायुतीत जागा वाटपावरून पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढणार असल्यामुळे भाजपला काही जागांचा त्याग करावा लागू शकतो. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते.

जागा वाटपाचा तिढा कायम

शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतरही जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील प्रमुख भाजप नेते दिल्लीला रवाना झाले. हायकमांडशी चर्चा केल्यानंतर जागा वाटपावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठे विधान केले. 11-12 तारखेपर्यंत अंतिम निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, महायुतीच्या जागावाटपात विजय हा एकमेव निकष आहे. महायुतीतील सर्व पक्षांचा सन्मान ठेवला जाईल. महायुतीतील जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. 11-12 मार्चपर्यंत जागावाटपाचा निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा कशा जिंकायच्या याशिवाय कोणतेही सूत्र नाही. त्यांच्या विजयासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करतील.

 

Lok Sabha Election अन् पेच

राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. मागील लोकसभेला शिवसेना आणि भाजप एकत्र लढली होती. तेव्हा महायुतीला जनतेने कौल दिला होता. मात्र, आता परिस्थिती वेगळी असून शिवसेनेतील फूट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महायुतीतील सहभाग यामुळे चित्र काहीसे बदलले आहे.

दरम्यान, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आता 13 खासदार आहेत. पण निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाईल असा मानस भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांचा आहे.

News Title- Maharashtra BJP President Chandrashekhar Bawankule has made a big statement about Lok Sabha Election and seat allocation
महत्त्वाच्या बातम्या –

18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान

लवासाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; पवारांनी उचललं महत्त्वाचं पाऊल

शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली सर्वात मोठी घोषणा!