महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सर्वात मोठं गिफ्ट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

LPG Cylinder | आज 8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. या निमित्तच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठं गिफ्ट दिलं (LPG Cylinder) आहे. लवकरच लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच मोदी सरकारने ही खेळी खेळली आहे.

लोकसभेमुळे गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता हे खरं ठरलं आहे. मोदी सरकारने आज महिला दिनी सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी स्वस्त केल्या आहेत. स्वत:नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा

“आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट (LPG Cylinder) देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुसह्य होणार नाही, तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल”, अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

“आमचे सरकार शिक्षण, उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या दशकातील आपल्या कामगिरीवरूनही हे दिसून येते.”, अशा शुभेच्छाही मोदी यांनी दिल्या आहेत.

LPG सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त

काही वर्षांपुर्वी 500 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळायचे. मात्र, नंतर हीच किमत 1100 रुपयांच्या घरात पोहोचल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दिवाळीच्या जवळपास केंद्र सरकारने 200 रुपयांची सबसिडी दिली होती. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 918.50 रुपये आहे.

आज 8 मार्च, जागतिक महिला दिनी सिलेंडरच्या किंमती 100 रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी सरकारच्या या घोषणेमुळे नागरिकांना हे मोठं गिफ्ट मिळालं आहे. आता लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती देखील कमी होण्याची शक्यता आहे.

News Title- Pm Modi Announces Cut In Lpg Cylinder Prices By Rs 100

महत्त्वाच्या बातम्या –

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम? या दिवशी होणार अंतिम निर्णय; बावनकुळेंचं मोठं विधान

18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान

लवासाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; पवारांनी उचललं महत्त्वाचं पाऊल