महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bollywood | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचा विवाहपूर्व सोहळा जामनगरमध्ये पार पडला. जगभरातील नामांकित मंडळी या सोहळ्याला उपस्थित होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्यामध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत हे सेलिब्रिटी जोडप्यांना महागड्या भेटवस्तू घेऊन पोहोचले होते. (bollywood celebrity Expensive Gifts To Anant Ambani) मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपूर्व सोहळा 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातमधील जामनगर येथे आयोजित करण्यात आला होता.

विवाहपूर्व सोहळ्याला बी-टाऊनचे अनेक बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. या स्टार्सनी त्यांच्या अभिनयाने या जोडप्याचा हा सोहळा केवळ संस्मरणीय बनवला नाही तर त्यांना अनमोल भेटवस्तूही दिल्या. या सेलिब्रेशनमध्ये अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी कतरिना कैफही सहभागी झाले होते. या जोडप्याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना लक्झरी ब्रँडचे ब्रेसलेट आणि डायमंड नेकलेस भेट दिले.

अनंत-राधिकाला महागड्या भेटवस्तू

तसेच कियारा अडवाणी ही ईशा अंबानी यांची बालपणीची मैत्रीण आहे. अनंत आणि राधिकाच्या विवाहपूर्व सोहळ्याला तिने पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत हजेरी लावली. ‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्यासाठी कियारा आणि सिद्धार्थने हिऱ्याने बनवलेली श्री गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती आणली होती.

या यादीत शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांचीही नावे आहेत. ज्यांनी राधिका मर्चंटला महागडा रुबी जडलेला डायमंड नेकलेस आणि अनंत अंबानींना महागडा परफ्यूम भेट दिला. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांची मुलगी राहा कपूरसोबत पोहोचले होते. माहितीनुसार, या जोडप्याने राधिका मर्चंटला महागडी डायमंड जडलेली पर्स आणि अनंत यांना सर्वात महागडा शू सेट दिला आहे.

Bollywood कलाकारांची हजेरी

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी अनंत आणि राधिका यांना एका लक्झरी ब्रँडच्या डायमंड जडलेल्या कपल घड्याळांचा सेट दिला आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने अनंत अंबानी यांना 5 कोटी रुपयांची आलिशान स्पोर्ट्स कार भेट दिली आहे.

याशिवाय सुपरस्टार सलमान खाननेही अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगला हजेरी लावली होती. अभिनेत्याने अनंत यांना फिलिप ब्रँडचे कस्टमाइज लक्झरी घड्याळ आणि राधिकाला डायमंड इअरिंग दिले आहे.

News Title- Bollywood celebrities have given expensive gifts to Anant Ambani and Radhika Merchant
महत्त्वाच्या बातम्या –

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान

लवासाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; पवारांनी उचललं महत्त्वाचं पाऊल

शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

गुड न्यूज! ‘पुष्पा 2’ मध्ये होणार बॉलिवूडमधील ‘या’ सुपरस्टारची एंट्री

मोठी बातमी! सागर बंगल्यावर सुप्रिया सुळे आणि फडणवीसांची भेट?