हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 4-5 दिवसांत…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | मागील काही आठवड्यामध्ये महाराष्ट्रात काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात (Weather Update) या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान झाले.

अवकाळी पावसासोबतच गारपीट देखील झाली. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. वातावरणामध्ये मागील काही आठवड्यामध्ये सतत बदल दिसून आले. कुठे ढगाळ वातावरण, तर कुठे अवकाळी आणि कुठे कडक ऊन दिसून आले. आता हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे.

तापमानात वाढ होणार

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आता तापमानात वाढ होत असून, किनारपट्टी भागांमध्येही हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढताना दिसत आहे. परिणामी उन्हाची तीव्रता अपेक्षेहून जास्त जाणवू लागली आहे. आता रात्री थंडी आणि दिवसा उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू (Weather Update) वाढ होण्याची शक्यता आहे.

उन्हाचे चटके जाणवू लागले

राज्यात नाशिक, जळगाव आणि मोहोळ येथे 14.9 अंश सेल्सिअसच्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे 38.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची (Weather Update) नोंद झाली आहे. त्यामुळे हळूहळू तापमान वाढत आहे.आता उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.

सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर या भागांमध्ये उन्हाळा जास्त तीव्र होत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे दुपारच्या वेळी काम नसल्यास घराबाहेर न पडण्याचा इशारा नागरिकांना देण्यात येत आहे. या काळात आरोग्याबाबतही अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News Title : Maharashtra Weather Update news 

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षणाबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी!

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून महत्त्वाची घोषणा

‘भाजपाकडून दोनदा निमंत्रण’, इंडिया आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाशिवरात्रीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

इमरान हाश्मीच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ; स्वतःच खुलासा करत म्हणाला..