महाशिवरात्रीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

Mahashivratri Rashi Bhavishya | आज (8 मार्च) महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. पहाटेपासूनच भाविक शिव मंदिरात गर्दी करत आहेत. आजच्या महाशिवरात्रीची महिमा (Mahashivratri Rashi Bhavishya) मोठी असल्याने भाविकांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो.

आजच्या दिनी शिव भक्त व्रत ठेवतात, पूजा-पाठ करतात. भगवान शिवाची आराधना करतात. आजच्या दिनी भगवान शिव लवकर प्रसन्न होतात, असं म्हटलं जातं. म्हणूनच भाविक मनोभावे शिवकि पूजा-अर्चना करतात. आजचा महाशिवरात्रीचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.

आज 8 मार्चचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी (Horoscope Today) असते. ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे वर्णन केलेले असते.

आज महाशिवरात्री आणि प्रदोष दिनी चंद्र स्वतःच्या मालकीच्या नक्षत्रातुन आणि शनिच्या राशीतून भ्रमण करणार आहे. शनिचा केतुशी संयोग होत असुन शिव पुजन आणि शिव योगात तुमचा दिवस कसा असणार, याचे राशी भविष्य खाली दिले आहे.

आजचे राशी भविष्य

वृषभ : आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बौद्धिक चातुर्याने (Mahashivratri Rashi Bhavishya) आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील. उद्योग व्यापामध्ये धनलाभ होईल.  अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल.

मिथुन : आजच्या दिनी कलाकारांना नवीन संधी मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. यामुळे तुम्ही कामात अधिक मन लावाल. तुमच्या कार्यात तुमचे कौशल्य दिसून येईल. कार्याचे कौतुक होईल. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका घ्याल. शासकीय पोलिस यंत्रणेतील व्यक्तींना उत्तम दिनमान आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहिल.

कर्क : कोणतेही कार्य घाईत करू नका, मोठा घाटा होऊ शकतो. अतिरिक्त ताणतणाव वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे अवलंबून राहू नका. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. राग आणि वादविवाद टाळा.

सिंह : आज तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात करू शकता, तुम्हाला यश प्राप्ती होईल.नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विदयार्थ्याच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. तुम्हाला जोडी दाराची साथ लाभेल. कुटुंबात सहकार्याची भावना असेल.

कन्या : वैवाहिक आयुष्यात सुखी राहाल. (Mahashivratri Rashi Bhavishya) आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. आपला छंद जोपासाल. तुमच्या नवीन कल्पनांना चालना मिळणार. आजचा दिवस आनंदी जाईल.

तूळ : नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे.वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल.

News title – Mahashivratri Rashi Bhavishya

महत्वाच्या बातम्या-

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम? या दिवशी होणार अंतिम निर्णय; बावनकुळेंचं मोठं विधान

18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान

लवासाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; पवारांनी उचललं महत्त्वाचं पाऊल