‘भाजपाकडून दोनदा निमंत्रण’, इंडिया आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abu Azmi | देशात तसंच राज्यातही सध्या भाजपचं वादळ चांगलंच वाहत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील बरेच नेते भाजपामध्ये सामील झाले आहेत. तर काहींनी भाजपासोबत युती केली आहे. त्यामुळे राज्यातही आता सगळीकडे भाजपाच शक्तिशाली पक्ष असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच समाजवादी पक्षाच्या नेत्याने (Abu Azmi) केलेल्या एका दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात चर्चा रंगली आहे. अबू आझमी हे काल (8 मार्च) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

अबू आझमींचा मोठा गौप्यस्फोट

मिल्ली तहरीक फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमास जाण्यापूर्वी जळगावात आझमी (Abu Azmi) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मला भाजपाकडून एकदा नाही तर दोनवेळा निमंत्रण आलं आहे.  मात्र, त्यांनी पहिले महात्मा गांधींबद्दल चुकीचे बोलणे, त्यांच्या खुन्याचे कौतुक करणे बंद करावे. त्यांच्या सरकारमध्ये एकही मंत्री मुस्लिम नाही, मुस्लिमांनाही त्यांचा हिस्सा मिळायला हवा. त्यांनाही आपला परिवार म्हणून स्थान मिळायला हवे. या अटी-शर्थी मानल्या तर भाजपसोबत जाण्याचा विचार करू.”

अबू आझमी यांच्या या विधानाची आता एकच चर्चा रंगली आहे. इंडिया आघाडीतील समाजवादी पक्ष हा महत्वाचा आहे. मात्र, यातीलच आमदाराने केलेल्या या विधानामुळे राजकारणात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अबू आझमींना भाजपची ऑफर

पुढे अबू आझमी (Abu Azmi) म्हणाले की, सरकार संविधानाच्या विरोधात वागत आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. याकडे दुर्लक्ष करून देशात हिंदू-मुस्लिममध्ये वाद निर्माण केले जात आहेत. दरी निर्माण करून धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. सरकार द्वेषयुक्त भाषणे रोखू शकले नाहीत.

त्यामुळे आम्ही द्वेषाच्या विरोधात हिंदू-मुस्लिम एकतेसाठी लढाई लढत आहोत.महाराष्ट्रामध्ये सपा आगामी निवडणुकांत स्वतंत्र असून, आमची कोणाशीही युती नाही. लोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ, त्यांच्याबरोबर राहू, अशी भूमिका यावेळी आझमी यांनी स्पष्ट केली.

News Title-  Abu Azmi Claim Bjp Offer Him To Join Party

महत्त्वाच्या बातम्या –

महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सर्वात मोठं गिफ्ट!

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम? या दिवशी होणार अंतिम निर्णय; बावनकुळेंचं मोठं विधान

18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान