इमरान हाश्मीच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ; स्वतःच खुलासा करत म्हणाला..

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Emraan Hashmi | अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने इंडस्ट्रीमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याने अनेक हॉरर तसेच रोमॅंटिक चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या चित्रपटातील प्रत्येक गाणी फेमस होतात. त्याची ‘सिरियल किसर’ म्हणून ओळख आहे. मात्र आता त्याने नुकताच एक खुलासा केला आहे.

ज्यामुळे इमरान हाश्मीचे चाहते चिंतेत पडले आहेत. अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. याबाबत इमरानने स्वतःच मोठा खुलासा केला आहे. त्याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यात तो आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना दिसला.

Emraan Hashmi चा मोठा खुलासा

इमरानने या मुलाखतीमध्ये म्हटलं की, “मी गेल्या दोन वर्षांपासून एकच गोष्ट खात आहे. रताळे आणि चिकन हे दोन पदार्थ मी रोज खात आहे. हे दोन्ही पदार्थ लवकर पचन होतात. यासोबतच मी सॅलडही खाण्यास प्राधान्य देतो. असं नेहमी नेहमी एकच पदार्थ नक्कीच बोरिंग आहे.पण, मला हे जमतंय.”

इमरान (Emraan Hashmi) आपल्या फिटनेसवर अधिक फोकस असल्याचं यातून दिसून येतं. मात्र, त्याची हीच सवय त्याच्या वैवाहिक आयुष्यात कलह निर्माण करत असल्याचे त्याने सांगितलं. त्याच्या या डाएटमुळे त्याची पत्नी परेशान झाली आहे. त्यांच्यात या गोष्टीमुळे अनेक वाद होत आहेत.

फिटनेससाठी इमरान दोन वर्षांपासून खातोय एकच पदार्थ

“माझ्या या डाएटमुळे मला माझी पत्नी सोडून जाण्याची धमकी देत आहे”, असं इमरान या मुलाखतीमध्ये म्हणाला आहे. मात्र, त्याने ही गोष्ट मिश्किलपणे बोलून सांगितली. त्यामुळे इमरानच्या वैवाहिक आयुष्यात सगळं काही ठीक असल्याचं यातून दिसतं.

इमरानने या डाएटमागील कारणही यावेळी सांगितलं. एक अभिनेता म्हणून मला माझ्या बॉडी शेपची विशेष काळजी घ्यावी लागते, ज्यासाठी हा आहार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. असं इमरान यावेळी म्हणाला. इमरानने ‘शोटाइम’ हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. यात राजीव खंडेलवाल आणि मौनी रॉय दिसणार आहेत. त्यामुळे सध्या इमरान (Emraan Hashmi) आपल्या आगामी चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे.

News Title- Emraan Hashmi Shocking revelation

महत्त्वाच्या बातम्या –

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम? या दिवशी होणार अंतिम निर्णय; बावनकुळेंचं मोठं विधान

18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान

लवासाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; पवारांनी उचललं महत्त्वाचं पाऊल