“दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | धाराशीवमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल (7 मार्च) रोजी सभा झाली आहे. यासभेमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला. त्यानंतर भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली, मात्र त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्या यादीमध्ये नाव नाही. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव नाही. यावर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत ऑफर दिली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची नावं नाही. तसेच त्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव नाही. मग नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीमध्ये यावं, अशी ऑफर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे.

भ्रष्टाचार केलेल्या काँग्रेसच्या कृपाशंकर सिंह या माणसाने भाजपमध्ये प्रवेश केला. त्या माणसाचे नाव यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण नितीन गडकरी यांचं नाव नाही. नितीनजी तुम्ही राजीनामा द्या. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणतो, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

निवडणुका आल्यावर सबका साथ, मेरा दोस्त आणि निवडणुकानंतर भाई और बहनो आणि त्यांच्या मतलबानंतर तुमच्याकडे बघत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

“अबकी बार भाजप तडीपार”

कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांचा आहे. 25 वर्षे राहत मी शिवसेनेची भाजप होऊ दिली नाही. मग शिवसेनेची काँग्रेस कशी होऊ देणार? असा सवाल आता उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या निवडणुकीत भाजप पुन्हा निवडूण आली तर लोकशाहीचा मुडदा पाडणार आहे, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

लोकशाहीचा मुडदा पाडायचा आहे की नाही हे आता तुम्ही पाहा. अबकी बार भाजप तडीपार. मी आज भाजपला तडीपारची नोटीस देत आहे. त्यांना तडीपार करायचं असेल तर तुम्ही सह्या करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

News Title – Uddhav Thackeray Offer to Nitin gadkari

महत्त्वाच्या बातम्या

महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सर्वात मोठं गिफ्ट!

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम? या दिवशी होणार अंतिम निर्णय; बावनकुळेंचं मोठं विधान

18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान