अभिनेत्री आलिया भट्ट ‘त्या’ पोस्टमुळे होतेय ट्रोल; राहाचं नाव घेत नेटकरी म्हणाले..

Alia Bhatt | अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर दोघेही सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. त्यांची लाडकी मुलगी राहा देखील कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. राहाचा एक फोटो जरी समोर आला की, लगेच त्यावर कमेन्टचा वर्षाव केला जातो.

राहा ही आपले पंजोबा राज कपूर यांच्या सारखीच दिसते, असं चाहते म्हणतात. पहिल्यांदा जेव्हा राहा मीडियासमोर आली तेव्हा तिच्या सुंदर आणि आकर्षक डोळ्यांची खूपच तारीफ झाली. राहाचा आणि राज कपूर यांचा फोटो तेव्हा ट्रेंडमध्ये होता. तर आज (8 मार्च) राहा पुन्हा चर्चेत आली आहे.

राहाची आई अभिनेत्री आलिया भट्टने आज महिला दिनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आलियाने दिलेल्या कॅप्शनमुळे तिला नेटकरी चांगलंच ट्रोल करत आहेत. आलियाने पोस्ट केलेला फोटो आणि त्यावरील कॅप्शन वाचून नेटकऱ्यांना राहाविषयी प्रश्न पडला आहे.

आलिया भट्टची पोस्ट

आलियाने (Alia Bhatt) पोस्ट केलेल्या फोटोमध्ये हाताने बनवलेली एक भेटवस्तू पहायला मिळतेय. लाल रंगाचा हा हार्ट (हृदय) पाहून 16 महिन्यांची राहा शिलाई करू शकते का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. कारण प्रश्नात पाडणारे कॅप्शन आलियाने या पोस्टला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

‘माझ्या लाडक्या चिमुकल्या मुलीने माझ्यासाठी हे बनवलंय आणि तो मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करतेय. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. स्वत:चा दिवस साजरा करण्यासाठी आज आणि आयुष्यातील प्रत्येक दिवसातील काही क्षण आवर्जून काढा’, असं कॅप्शन आलियाने फोटो पोस्टला दिलं आहे.

यामध्ये हार्टच्या आकाराचा शिवलेला कापड पहायला मिळतोय. त्यावरील बारिक शिलाई स्पष्ट पहायला मिळतेय. या फोटोवरून नेटकऱ्यांनी आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावर नेटकरी आता प्रतिक्रिया देत आहेत.

आलिया भट्ट ट्रोल

‘राहाला शिलाई करता येते का? एवढी लहान मुलगी हे कसं बनवू शकते? सहज कुतूहल म्हणून विचारतेय’, असं एकाने लिहिलं. तर ‘काहीही.. सेलिब्रिटी आहे म्हणून काहीही पोस्ट करायचं का’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘राहा इतकी मोठी झाली का, ज्यामुळे तिला हे सर्व बनवता येतंय’, ‘आम्हाला वेड्यात काढू नकोस’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आलियाला (Alia Bhatt) ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

News Title : Alia Bhatt trolled on social media

महत्त्वाच्या बातम्या –

मराठा आरक्षणाबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी!

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून महत्त्वाची घोषणा

‘भाजपाकडून दोनदा निमंत्रण’, इंडिया आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाशिवरात्रीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

इमरान हाश्मीच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ; स्वतःच खुलासा करत म्हणाला..