खिशाला लागणार कात्री; ग्राहकांना मोठा शॉक

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Tata Power hikes tariff | टाटा वीज कंपनीच्या निवासी ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. काही दिवसांनंतर वीज दरामध्ये मोठी दरवाढ केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. या दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Tata Power hikes tariff) कंपनीपेक्षा 24 टक्के जास्त दर टाटा कंपनीच्या वीज ग्राहकांचे असणार आहे.

ज्या ग्राहकांचा प्रत्येक महिन्याला 100 युनिटपर्यंत वापर आहे, त्यांच्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. त्यातच ज्यांचा विजेचा वापर हा 101 ते 500 युनिट असेल त्यांना याचा फटका अधिक बसणार आहे. या निर्णयाचा आता विरोध केला जात आहे.

या निर्णयानुसार आता 0-100 युनिटसाठी विजेचे दर 5.33 तर 501 पेक्षा जास्त युनिटसाठी 15.71 असे हे दर असणार आहेत. टाटा कंपनीने निवासी ग्राहकांसाठी दरवाढीचा प्रस्ताव आयोगापुढे सादर केला. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला.

येत्या 1 एप्रिलपासून ही दरवाढ केली जाणार आहे. त्यामुळे 1 तारखेनंतर ग्राहकांना वाढीव बिल येईल. ‘टाटा पॉवर’च्या थेट ग्राहकांना हा वीज दरवाढीचा फटका बसणार आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना वीज दरवाढीमुळे मोठी झळ बसेल.

वीज दरवाढ का झाली?

आयोगाने महसुलातील तूट भरून काढण्यासाठी 23-24 मध्ये मंजूर केलेले वाढीव वीजदर लागू न केल्याने ही वाढ मान्य करण्यात आली. आयोगाने ग्राहकांना मिळणारी रोख सवलत विचारात घेतली असून त्यानुसार वर्ष 2023-24 आणि 24-25 साठीच्या महसुलात 100.2 कोटींची घट झाली आहे. त्यामुळे ही दरवाढ (Tata Power hikes tariff) करण्यात आली.

असे असतील नवे दर

युनिट / वीज दर (युनिटनिहाय दर रुपयांत)

0-100 युनिटसाठी 5.33
101-300 युनिटसाठी 8.15
301-500 युनिटसाठी 14.77
501 वर 15.71

News Title : Tata Power hikes tariff from April 1

महत्त्वाच्या बातम्या –

मराठा आरक्षणाबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी!

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून महत्त्वाची घोषणा

‘भाजपाकडून दोनदा निमंत्रण’, इंडिया आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाशिवरात्रीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

इमरान हाश्मीच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ; स्वतःच खुलासा करत म्हणाला..