सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी; थेट म्हणाल्या..

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

यावरूनच सुप्रिया सुळे यांनी मोदींवर टीका करत त्यांच्याकडे मागणी केली आहे. त्या आज (8 मार्च) माध्यमांशी संवाद साधत होत्या. मोदींची ही घोषणा जुमलेबाजी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मोदी सरकार मागच्या नऊ वर्षांपासून सत्तेत आहे. मग सिलिंडरच्या दरात कपात करण्यासाठी आजचाच मुहूर्त का? आता लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक जुमला आहे. हा एक राजकीय निर्णय असून त्यात महिलांना दिलासा देण्याचा कोणताही उद्देश दिसत नाही. अशी टीका सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी केली आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, “आमच्या काळात गॅस सिलिंडर 430 रुपयांना मिळत होता. महिलांवरील आर्थिक भार कमी करायचा असेल तर सिलेंडरचे भाव अर्ध्यावर आणायला हवेत”, अशी मागणीच यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मोदी सरकारने निवडणुकीमुळे हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी म्हटलं.

मोदींची घोषणा काय?

“आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट (LPG Cylinder) देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुसह्य होणार नाही, तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल”, अशी पोस्ट नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

LPG सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त करून नरेंद्र मोदी यांनी महिला दिनी मोठं गिफ्ट दिलं आहे. मात्र विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. 100 किंवा 200 नाही तर किमती अर्ध्यावर कमी कराव्यात, अशी मागणी आता विरोधक करत आहेत.

News Title- Supriya Sule big demand from PM Modi

महत्त्वाच्या बातम्या –

महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम? या दिवशी होणार अंतिम निर्णय; बावनकुळेंचं मोठं विधान

18 ते 59 या वयोगटातील महिलांना दरमहा मिळणार एवढे रूपये; मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

महागडी पर्स ते लक्झरी घड्याळ…; अनंत-राधिकाला बॉलिवूड कलाकारांनी दिल्या या भेटवस्तू

‘हिंमत असेल तर…’; शरद पवारांचं भाजपला आव्हान

लवासाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर; पवारांनी उचललं महत्त्वाचं पाऊल