मराठा आरक्षणाबाबत गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maratha Reservation | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा लढताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) सरकारकडे मागणी केली होती. सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याबाबत घोषणा केली. याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.

मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट 

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) दिलं असल्याची माहिती आता समोर आली आहे. मात्र यावर नेहमी चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी झाली. सुनावणीमध्ये भरती न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहिल असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) दिलं. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देण्यात आलं, असा निर्णय मंत्रीमंडळामध्ये घेण्यात आला. त्यानंतर पोलिस भरती, शिक्षक भरतीमध्ये हे आरक्षण लागू केलं.

पुढील सुनावणी ही 12 मार्च

राज्यामध्ये 17 हजार जागांवर पोलिस भरती सुरू आहे. तसेच दोन हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. 50 हजार मेडिकल विद्यार्थ्यांचा प्रवेश मराठा आरक्षणामध्ये करता येणार आहे. म्हणून आता यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. दरम्यान पुढील सुनावणी ही 12 मार्च रोजी होणार आहे.

50 टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार हा मुद्दा मांडला. राज्यघटनेपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, असं ते म्हणाले. राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू मांडली आहे. एकाच मुद्यावर अनेकदा याचिका दाखल करणं योग्य ठरणार नाही, असं सदावर्ते म्हणाले.

राज्य सरकारला केवळ तारीख पे तारीख पाहिजे. मेडिकल प्रवेश तारखा आम्ही कोर्टाच्या निदर्शणास आणल्या. सुप्रीम कोर्टाचे आम्ही दाखले दिले आहेत, ते मी मान्य केलं आहे.

News Title – Maratha Reservation Big update

 महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षणाबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी!

पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून महत्त्वाची घोषणा

‘भाजपाकडून दोनदा निमंत्रण’, इंडिया आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाशिवरात्रीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

इमरान हाश्मीच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ; स्वतःच खुलासा करत म्हणाला..