महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar Ed | गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar Ed) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचा तपास ईडीने केला. हा तपास वेगवेगळ्या पातळीवर तीन वेळा करण्यात आला. यावेळी रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर रोहित पवारांच्या नावाने घोषणा देणं सुरू ठेवलं होतं. मात्र अशातच आता रोहित पवार (Rohit Pawar Ed) यांचा कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने (Rohit Pawar Ed) जप्त केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ

बारामती अॅग्रो या कंपनीचा गेली अनेक दिवसांपासून तपास सुरू होता. या तपासामध्ये बारामती अॅग्रोने कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतला होता. आता तोच कारखाना ईडीने (Rohit Pawar Ed) जप्त केला आहे. तसेच यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ लागली आहे.

कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त

ईडीने शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली असता कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. हा साखर कारखाना 161 एकरमध्ये आहे. या साखर कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख रूपये आहे. रोहित पवार यांची तीन दिवस चौकशी सुरू होती. यामुळे आता रोहित पवार हे अडचणीत सापडले आहेत. कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करताना शिखर बँकेने जी प्रकिया राबवली होती, ती चुकीची असल्याचं ईडीचं म्हणणं आहे.

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याबाबत कारवाईची माहिती घेत ईडीने प्राथमिक तपासाला सुरूवात केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने 2019 मध्ये दिलेल्या निकालाचा देखील अभ्यास करण्यात आला.

मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने याबाबत आता मोठा निर्णय घेतला आहे. यंत्रसामग्री, जमीन, प्लांट, साखर युनीटी सर्व जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीची ईडीने तपासणी केली. अनेक दिवसांपासून ईडीने तपास केला. मात्र आता रोहित पवार यांच्या कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होऊ लागली आहे.

News Title – Rohit Pawar Ed latest News

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्री आलिया भट्ट ‘त्या’ पोस्टमुळे होतेय ट्रोल; राहाचं नाव घेत नेटकरी म्हणाले..

“दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा”

हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 4-5 दिवसांत…

“होय, मला आदित्यला मुख्यमंत्री बनवायचं आहे”

खिशाला लागणार कात्री; ग्राहकांना मोठा शॉक