रामदास कदम यांच्या मुलावर मोठी जबाबदारी, दिलं ‘हे’ पद

Ramdas Kadam | महायुतीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून घमासान सुरू आहे. यामध्ये शिवसेनेला भाजपहून कमी जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी केली आहे. यावर आता रामदास कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या मुलाला मोठं पद देण्यात आलं आहे.

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कान धरले पाहिजेत, असं रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले. यावर आता फडणवीस  यांनी 115 जागा आमच्या असल्या तरीही खऱ्या शिवसेनेच्या शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं, असं फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले रामदास कदम?

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कान धरले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आली आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका असं वक्तव्य रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलं आहे. यानंतर रामदास कदम यांच्या प्रतिक्रियेनंतर रामदास कदम यांच्या मुलाला मोठं पद देण्यात आलं आहे.

रामदास कदम यांच्या मुलाला मोठं पद

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाच्या पदी निवड करण्यात आली आहे. पर्यावरण आणि संबंधीत क्षेत्रामध्ये 25 वर्षांचा अनुभव असणं गरजेचा आहे. तरच त्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती करता येते.

रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाच्या पदी निवड करण्यात आली. मात्र सिद्धेश यांचं संबंधीत क्षेत्रातील कामाचा अनुभव किती आहे. जर या क्षेत्रामध्ये 25 वर्षे काम केल्याचा अनुभव असेल तर त्याला हे पद दिलं जातं.

सिद्धेश यांना दिलेल्या पदाबाबत अद्यापही विरोधकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यावर आता विरोधक आणि रामदास कदम काय प्रतिक्रिया देतील हे कळेल.

News Title – Ramdas Kadam Son Siddhesh kadam Offer opportunity

महत्त्वाच्या बातम्या

‘भाजपाकडून दोनदा निमंत्रण’, इंडिया आघाडीतील ‘या’ बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाशिवरात्रीचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ!

इमरान हाश्मीच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ; स्वतःच खुलासा करत म्हणाला..

‘या’ 3 गोष्टींमुळे खिसा कायम पैशांनी भरलेला राहील!

महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सर्वात मोठं गिफ्ट!