Salman Khan | अभिनेता सलमान खानचा चाहता वर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात दिसून येतो. सलमानचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स आहेत. तो सतत चर्चेत राहत असतो. आता त्याच्या (Salman Khan ) एका व्हीडिओमुळे तो चर्चेत आला आहे.
यामध्ये सलमान खान चाहत्यावर चांगलाच भडकताना दिसून येत आहे. त्याचा हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल होत आहे. सलमानने आपल्या एका चाहत्याला काहीतरी डिलिट करण्यासाठी सांगितल्याचे यातून दिसून येत आहे. नेटकरी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
चाहत्यावर भडकला सलमान खान
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सलमान (Salman Khan) एका चाहत्याला फोन बंद करण्यास सांगताना दिसून येत आहे. सलमानने त्या चाहत्याला व्हिडीओ डिलीट करण्यासही म्हटलं. एक चाहता त्याच्या फोनमध्ये सेल्फी व्हिडीओ रेकॉर्ड करत असतो. जेव्हा सलमानची नजर त्याच्यावर पडते, तेव्हा तो भडकतो.
सलमान बोटाने इशारा करत त्याला फोन बंद करण्यासाठी सांगतो. तसंच शूट केलेला व्हिडीओसुद्धा डिलीट करण्याचा इशारा देतो. सलमानचे शब्द ऐकून हा चाहता लगेच सलमानची माफी मागतो. मात्र नंतर तोच चाहता सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करतो. यानंतर नेटकरीही या चाहत्यावर भडकले आहेत.
सलमानचा व्हिडीओ व्हायरल
‘सॉरी सर, सॉरी सर’ म्हणत हा चाहता व्हिडीओ काढणं बंद करतो. मात्र याच चाहत्याने व्हिडीओ पोस्ट केल्याने त्याच्यावर टीका होत आहे. सलमानने व्हिडीओ डिलीट करायला सांगितलं तरी तू इथे पोस्ट का केलास, असा सवाल सोशल मिडियावर नेटकरी करत आहेत. तर बॉलिवूड कलाकारांना अशा पद्धतीने फॉलो करू नका, असंही एका युजरने म्हटलंय.
View this post on Instagram
दरम्यान, सलमान खानच्या (Salman Khan ) चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो गेल्या वर्षी ‘टायगर 3’ मध्ये दिसून आला होता. तर, नुकताच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा जामनगर येथे पार पडला. यामध्ये सलमानने चांगलंच स्टेज गाजवलं. त्याने स्टेजवर शाहरुख खान आणि आमिर खानसोबत डान्ससुद्धा केला होता.
News Title- Salman Khan got angry with the fan
महत्त्वाच्या बातम्या –
नाना पाटेकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार?
रामदास कदम यांच्या मुलावर मोठी जबाबदारी, दिलं ‘हे’ पद
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!
लग्नाच्या काही तासांपूर्वी बापानं लेकाला संपवलं; हादरवणारं कारण समोर
अभिनेत्री आलिया भट्ट ‘त्या’ पोस्टमुळे होतेय ट्रोल; राहाचं नाव घेत नेटकरी म्हणाले..