ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gold-Silver Rate Today | सराफा बाजारात आज (9 मार्च) ग्राहकांची गर्दी कमी दिसून येत आहे. या आठवड्यात सोने-चांदीच्या किमती (Gold-Silver Rate Today) तेजीत आहेत. आजदेखील सोन्याने भरारी घेतली आहे. सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. मार्चमध्ये मौल्यवान धातूच्या किंमती वाढण्याचा अंदाज होता. तो खरा ठरला आहे.

सोने-चांदीच्या भावात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सराफा बाजारातील ग्राहकांची गर्दी आता कमी-कमी होत आहे. या महिन्यात 1 मार्चपासून ते 8 मार्चपर्यंत सोन्यात 2900 रुपयांची वाढ झाली आहे. 1 मार्च रोजी 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वाढल्या.

यानंतर किमती स्थिर होत्या. मात्र दोनच दिवसांत किमतीमध्ये पुन्हा तेजी आली. 6 मार्च रोजी 250 रुपयांनी सोने महागले. तर 7 मार्च रोजी त्यात 400 रुपयांची भर पडली. 8 मार्च रोजी किंमतीत 170 रुपयांची भर पडली.

आजचे सोने-चांदीचे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Rate Today) सोने-चांदीच्या कॅरेटनुसार किंमती ठरल्या आहेत. त्यानुसार आता 22 कॅरेट सोने 60,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीनेही घेतली उसळी

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी महागली. 2 मार्च रोजी 500 रुपयांची वाढ झाली. 3 मार्चला 1400 रुपयांनी भाव उतरले. तर 5 मार्च रोजी चांदी पुन्हा 1100 रुपयांनी वधारली.

यानंतर 6 तारखेला 200 रुपयांनी चांदी घसरली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्चला पुन्हा त्यात 500 रुपयांची वाढ झाली. काल, 8 मार्च रोजी त्यात पुन्हा 500 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार (Gold-Silver Rate Today) आता एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये झाला आहे.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

गुडरिटर्न्सनुसार 24 कॅरेट सोने 64,955 रुपये, 23 कॅरेट 64,695 रुपये, 22 कॅरेट सोने 59,499 रुपये झाले.18 कॅरेट 48,716रुपये, 14 कॅरेट सोने 37,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने (Gold-Silver Rate Today) आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही.तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title- Gold-Silver Rate Today 9 March

महत्वाच्या बातम्या-

रामदास कदम यांच्या मुलावर मोठी जबाबदारी, दिलं ‘हे’ पद

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

लग्नाच्या काही तासांपूर्वी बापानं लेकाला संपवलं; हादरवणारं कारण समोर

अभिनेत्री आलिया भट्ट ‘त्या’ पोस्टमुळे होतेय ट्रोल; राहाचं नाव घेत नेटकरी म्हणाले..

“दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा”