‘अशा’ घरात नेहमी असतो लक्ष्मीचा वास!

Chanakya Niti | भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ आचार्य चाणक्य यांचे नाव आजही घेतले जाते. त्यांचे (Chanakya Niti) खरे नाव विष्णुगुप्त होते. चाणक्य मौर्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे मुख्य सल्लागार आणि मंत्री होते. चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही उपयुक्त ठरतात.

त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते. त्यांच्या प्रत्येक तत्वामध्ये तथ्य असते.

मानवी जीवन सफल होण्यासाठी चाणक्य यांनी अनेक मार्ग सांगितले आहेत. या मार्गांचा जीवनात अवलंब केल्यास मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होते. जीवन जगण्यासाठी धन आवश्यक असते. आजही बऱ्याच जणांना आपल्या मूलभूत गरजा देखील भागवता येत नाहीत. मात्र, आयुष्यात पैसा हा अत्यंत गरजेचा असतो. त्यामुळे प्रत्येक जण धन प्राप्तीसाठी मेहनत घेत असतो.

चाणक्य यांनी मनुष्याचे काही गुण सांगितले आहेत, या गुणामुळे तो आर्थिक दृष्ट्या नेहमी समृद्ध असतो. अशा व्यक्तीवर नेहमी लक्ष्मीची कृपा असते. आपण कोणत्या वातावरणामध्ये राहतो, याचा देखील जीवनावर परिणाम होत असतो. चाणक्य यांनी अशाच काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे धनलाभ होतो.

अन्नाचा सन्मान

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्यानुसार, ज्या घरांमध्ये अन्नाचा नेहमी आदर केला जातो, त्या घरांमध्ये कशाचीच कमतरता नसते. माता लक्ष्मीच्या कृपेने अशा घरांची भांडी नेहमी भरलेली असतात. ज्या घरांमध्ये अन्नाचा आदर केला जात नाही किंवा अन्न वाया घालवले जाते, तेथे लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा वास राहत नाही.

ज्ञानी मनुष्याचा आदर

ज्या ठिकाणी ज्ञानी माणसाचा आदर राहत नाही, तिथे लक्ष्मी वास करत नाही. ज्ञानी माणसाचा नेहमी आदर करायला पाहिजे. कारण, एक ज्ञानी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. मूर्ख लोकांमुळे तुम्ही समस्यांनी घेरले जाऊ शकते. त्यामुळे ज्ञानी माणसाच्या नेहमी संपर्कात असावे.

पती-पत्नीमधील समर्पण भाव

चाणक्य यांच्या मते, (Chanakya Niti) ज्या घरात पती-पत्नी एकमेकांबद्दल प्रेम आणि आदराने राहतात, अशा घरांमध्ये नेहमी शांततेचे वातावरण असते आणि लक्ष्मी तेथे वास करते.ज्या घरात एकमेकांचा आदर केला जात नाही, पती-पत्नी एकमेकांसोबत भांडतात त्या घरांमध्ये नेहमी गरीबी भासते. त्यामुळे घरात नेहमी शांततेचे वातावरण असावे आणि पती-पत्नीने एकमेकांचा आदर केला पाहिजे.

News Title- Chanakya Niti for happiness and prosperity

महत्त्वाच्या बातम्या –

रामदास कदम यांच्या मुलावर मोठी जबाबदारी, दिलं ‘हे’ पद

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

लग्नाच्या काही तासांपूर्वी बापानं लेकाला संपवलं; हादरवणारं कारण समोर

अभिनेत्री आलिया भट्ट ‘त्या’ पोस्टमुळे होतेय ट्रोल; राहाचं नाव घेत नेटकरी म्हणाले..

“दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा”