‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनयासोबतच आपल्या फिटनेसमुळेही ओळखली जाते. शिल्पा सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते. सतत पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहात असते. मात्र एका गोष्टीवरुन शिल्पाला (Shilpa Shetty) अजूनही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केल्यानंतर शिल्पाला ट्रोल करण्यात आलं. शिल्पाने फक्त पैशांसाठी राज सोबत लग्न केल्याचं म्हटलं जातं. यामुळे शिल्पाला खूप काही ऐकावं लागलं. याबाबत तिने आता बोलून दाखवलं आहे. एका मुलाखतीमध्ये शिल्पाने या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

शिल्पा शेट्टीने पैशांसाठी लग्न केलं?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मुलाखतीमध्ये ती म्हणाली की, “राजसोबत लग्न केल्यानंतर मला गुगलने 108 क्रमांकावर सर्वांत श्रीमंत ब्रिटीश भारतीयांच्या यादीत सामिल केलं होतं. मला असं वाटलं हे चांगलं आहे. मला वाटलं लोकं शिल्पा शेट्टीला गुगल करणं विसरले असतील. जी सर्वात श्रीमंत महिला होती. मी सध्याच्या घडीला अधिक श्रीमंत आहे.”

“मी इनकम टॅक्स, जीएसटी आणि इतर सर्व गोष्टींसाठी कर भरते. एक यशस्वी महिला कधीच तिच्या जोडीदारामध्ये पैसा पाहात नाही. मी फक्त पैशांसाठी राजसोबत लग्न केलं नाही. तेव्हा राजपेक्षा अधिक श्रीमंत व्यक्ती मला आमिष दाखवत होते, पण माझ्या आयुष्यात पैसा सर्वकाही आहे… असं काहीही नव्हतं…’, असा खुलासा करत शिल्पाने (Shilpa Shetty) ट्रॉलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

शिल्पा शेट्टीचं ट्रॉलर्सला सडेतोड प्रत्युत्तर

शिल्पावर (Shilpa Shetty) पैशांसाठी लग्न केल्याची टीका सतत केली जाते. मात्र, तिने यावर टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे सध्या शिल्पा चर्चेत आली आहे. पाहायला गेलं तर, शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा 2021 मध्ये पॉर्न फिल्म बनवण्याच्या आणि पॉर्न व्हिडीओ एका ॲप्लिकेशनवर अपलोड करण्याच्या आरोपांमुळे चर्चेत आला होता.

या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. राज कुंद्रा याची जमिनावर सुटका झाली. पण आजही त्याच्या या चुकीबद्दल शिल्पा आणि कुटुंबाला टिकेचा सामना करावा लागतोय. आजही अनेक जण राजला ‘पॉर्न किंग’ म्हणून संबोधतात.त्यातच शिल्पाने पैशांसाठी लग्न केल्याच्या टिकेमुळे शिल्पाला वैयक्तिक आयुष्यात या गोष्टींचा बराच त्रास सहन करावा लागला आहे.

News Title- Shilpa Shetty reply to trollers

महत्त्वाच्या बातम्या –

‘अशा’ व्यक्तींचा सल्ला कधीच ऐकू नका, जीवनाचा होईल सर्वनाश!

‘आधी ते डिलीट कर’, सलमान खान चांगलाच भडकला; व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या उमेदवारीवरुन मोठा संघर्ष?, फडणवीस आणि तावडे आमने-सामने!

“ज्या गां**ना जायचं आहे त्यांनी जा, त्या अनाजी पंथ देवेंद्र फडणवीसाकडे”

नाना पाटेकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार?