“ज्या गां**ना जायचं आहे त्यांनी जा, त्या अनाजी पंथ देवेंद्र फडणवीसाकडे”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दौरा सुरू आहे. 8 मार्च रोजी धाराशिव येथेच उद्धव ठाकरे गटाची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्ला केला आहे. यावेळी त्यांनी बोलत असताना शिवराळ भाषेचा वापर करत ज्यांना जायचं आहे. त्यांनी जावं, तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनाजी पंथ असा उल्लेख केला आहे.

धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दौरा सुरू आहे. याठिकाणी सभा देखील झाली आहे. यावेळी बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर आणि शिंदे गटावर हल्ला केला आहे. यावेळी बोलत असताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची तोफ धडाडली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

महाशिवरात्रीचा दिवस आहे तरीही समोर एवढी लोकसंख्या आहे. भगवान शंकर म्हटलं की आपल्याला आठवतो तो शंकराचा तांडव. आपल्यालाही पळून गेलेल्या गद्दारांच्या छातीवर तांडव करून नाचायचं आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी केला.  इथे बसलेले निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ज्यांना भिती वाटते, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्या गां**नी थांबूच नये, अशा शाब्दिक घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला केला आहे.

“देवेंद्र फडणवीस अनाजी पंथ”

गद्दारांनी आमच्या आजूबाजूला फिरकू नये. ज्यांना जायचं त्यांनी जावं. अनाजी पंथ देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जावं. अजित पवार, नरेंद्र मोदींकडं जावं. जो मर्द आहे त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत राहावं, असा हल्ला संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी राम मंदीराबाबतही वक्तव्य केलं.

“आम्ही रामाला शोधतोय कॅमेरे मोदींवर”

संजय राऊत यांनी राम मंदीरावरूनही केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे. संजय राऊत म्हणाले की, तुम्ही जय श्रीराम म्हणा, मंदीराची प्राणप्रितिष्ठा करा. जर शिवसेना नसती तर आयोध्येत श्रीरामाचं मंदीर झालं असतं का? शिवसेनेचं सर्व सहकार्य आहे. शिवसेनेमुळे रामाचं मंदीर झालं. आम्ही प्रभु श्रीरामाला शोधत होतो पण आम्हाला नरेंद्र मोदी दिसत होते. आम्ही रामाला शोधतोय कॅमेरे मोदींवर, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

त्यानंतर बोलत असताना ते म्हणाले की आमचा राम हा उद्धव ठाकरेंमध्ये आहे. कोरोनाकाळामध्ये मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख बनून काळजी घेतली होती. आमचा राम हा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे, असं संजय राऊत म्हणाले

News Title – Sanjay Raut On Shinde Government And BJP

महत्त्वाच्या बातम्या

रामदास कदम यांच्या मुलावर मोठी जबाबदारी, दिलं ‘हे’ पद

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

लग्नाच्या काही तासांपूर्वी बापानं लेकाला संपवलं; हादरवणारं कारण समोर

अभिनेत्री आलिया भट्ट ‘त्या’ पोस्टमुळे होतेय ट्रोल; राहाचं नाव घेत नेटकरी म्हणाले..

“दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा”