बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल

Supriya Sule Vs Sunetra Pawar | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. केवळ पक्षामध्ये उभी फूट पडली नसून पवार कुटुंबामध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे आता बारामती मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आपल्या नणंद सुप्रिया सुळे (Supriya Sule Vs Sunetra Pawar) यांच्याविरोधात लढणार असल्याच्या चर्चा आहेत.

दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले होताना दिसत आहेत. अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जर बारामतीची जागा आमच्याकडे आली तर आम्ही सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊ असं वक्तव्य केलं होतं. यामुळे आता आगामी लोकसभा निवडणकीत ही पवार विरूद्ध पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) अशी लढत असणार असल्याची शक्यता आहे. (Supriya Sule Vs Sunetra Pawar)

बारामती लोकसभा निवडणुकीपूर्वी सुनेत्रा पवार यांची बॅनरबाजी करण्यात आली. तसेच सुप्रिया सुळे यांचे रथ देखील फिरवण्यात आले. यामुळे बारामतीमध्ये नणंद भाऊजय लढणार असल्याच्या चर्चा आहेत. यापार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे शरद पवार बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये  दौरे करताना दिसतात.

नणंद भाऊजय गळाभेट

महाशिवरात्रीनिमित्त बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) जळोचा काळेश्वर मंदीरामध्ये दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी योगायोगाने त्या जळोचा काळेश्वर मंदीरामध्ये भेटल्या. यावेळी नणंद आणि भाऊजय यांचे कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी एकमेकांना गळाभेट केली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार जळोचा काळेश्वर मंदीरामध्ये एकमेकींना भेटल्या. त्यांनी एकमेकींना गळाभेट दिली. आपली विचारपूस केली. यावेळी नणंद आणि बाऊजय यांनी एकमेकांकडे हसत आपल्यातील प्रेम त्या ठिकाणी दाखवले. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.


दरम्यान बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यास सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान उभं राहणार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता नणंद विरूद्ध भाऊजय लढतीत. बारामतीकर कोणाला कौल देणार ही आगामी लोकसभा निवडणूकच ठरवेल. तरीही अद्याप सुनेत्रा पवार लोकसभा लढणार असल्याच्या केवळ चर्चा आहेत. त्यावर शिक्कामोर्तब झाला नाही.

News Title – Supriya Sule Vs Sunetra Pawar News Update

महत्त्वाच्या बातम्या

‘आधी ते डिलीट कर’, सलमान खान चांगलाच भडकला; व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या उमेदवारीवरुन मोठा संघर्ष?, फडणवीस आणि तावडे आमने-सामने!

“ज्या गां**ना जायचं आहे त्यांनी जा, त्या अनाजी पंथ देवेंद्र फडणवीसाकडे”

नाना पाटेकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार?

रामदास कदम यांच्या मुलावर मोठी जबाबदारी, दिलं ‘हे’ पद