समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; रासपच्या जिल्हाध्यक्षासह दोघे ठार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Samrudhhi Highway Accident | समृद्धी महामार्गावरील अपघातसत्र थांबण्याचं काही नाव घेईना. या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. काल रात्री (8 मार्च) संभाजी नगर येथील समृद्धी महामार्गावरील (Samrudhhi Highway Accident) हर्सूल-सावंगी परिसरात भीषण अपघात घडला.

या महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर गाडी आदळली. या भीषण अपघातामध्ये दोन ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. ठार झालेल्यामध्ये रासपच्या दोन नेत्यांचा समावेश आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातसत्र सुरूच

राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (35) यांच्यासह संदीप साखरवाडे (40) यांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व कारने पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांना भेटण्यासाठी मुंबई गेले होते. परत जात असतांना हा (Samrudhhi Highway Accident) अपघात घडला.

रितेश भानादकर (वय 24) आणि आशिष सरवदे (वय73) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी आतापर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.

रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा मृत्यू

आता हा अपघात घडल्याने हा महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असल्याचं समोर येतंय. हा मार्ग आता अपघात मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या महामार्गावर आतापर्यंत जवळपास एक हजाराच्यावर अपघात घडले आहेत. यामधील गंभीर अपघातामध्ये आतापर्यंत 368 जणांनी आपला जीव गमावला आहे.

सर्वाधिक अपघात हे मध्यरात्रीच घडले आहेत. चालकाला झोप येणे किंवा डुलकी लागणे यामुळे 183 अपघात, तर टायर फुटल्यामुळे 51 अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. सततच्या अपघात सत्रामुळे चालकांमध्ये या महामार्गावरून जाण्यास एक भीती निर्माण होत आहे.

News Title- Samrudhhi Highway Accident Two killed

महत्त्वाच्या बातम्या –

“ज्या गां**ना जायचं आहे त्यांनी जा, त्या अनाजी पंथ देवेंद्र फडणवीसाकडे”

नाना पाटेकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढणार?

रामदास कदम यांच्या मुलावर मोठी जबाबदारी, दिलं ‘हे’ पद

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

लग्नाच्या काही तासांपूर्वी बापानं लेकाला संपवलं; हादरवणारं कारण समोर