“काँग्रेसमध्ये सुपारी बहाद्दर, खर्गे आपल्याला एक दिवस जेलमध्ये जावं लागेल”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटप झाली नाही. भाजपमध्ये पहिल्या उमेदवारीची यादी समोर आली. मात्र महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून बिघाडी पाहायला मिळते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) गेल्या काही दिवसांपासून केवळ चर्चा करत आहे पण चर्चेतून काहीच निष्पण्ण होताना दिसत नाही.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची एका हॉटेलमध्ये महाविकास आघाडीसोबत जागावाटपावरून चर्चा झाली. मात्र त्यातून काहीही समोर आलं नाही. म्हणून आता महाविकास आघाडीसोबत मी आहे. पण मला महाविकास आघाडीसोबत घेतलं जात नाही, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं होतं. इचलकरंजी येथे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची सभा झाली यासभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

तुमच्या पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्षांनी मोदींच्या घरासमोर धरणं द्यावं. त्यांना एवढंच सांगावं की हिंदुंना एकत्र येण्याचा सल्ला तुम्ही देत आहात त्याची सुरूवात आधी तुम्ही स्वत:पासून करा. पती-पत्नी एकत्र राहायला शिका. आज काँग्रेसवाले आम्हाला सांगायला लागले आहेत की भाजपसमोर आपण लढलं पाहिजे, आधी लढायला शिका आणि मग उपदेश द्या, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राहुल गांधीच्या यात्रेवर हल्ला

भाजप सरकार संविधान तुडवायला निघालं आहे. काँग्रेसच्या यात्रेमध्ये चतुर्वण्याच्या विरोधात समतेच्या बाजूने शेतकऱ्याच्या बाजूने संदेश आहे काय? एक लाट उभी करण्याची संधी आली होती, ती सोडून द्यायची आणि जे मोदींविरोधात लढतील त्यांच्याविरोधामध्ये शंका निर्माण करायच्या, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या यात्रेला लक्ष केलं आहे.

त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर बोलत असताना सुपारी बहाद्दर, अशी टीका केली आहे. तुमचा एक मुख्यमंत्री गेला. दुसरा मुख्यमंत्री राहिला. त्यालाही अजेंडा देण्यात आला आहे. काय आहे तो अजेंडा? तर एकीमध्ये बिघाड करणं. एकीमध्ये बिघाड करण्यात आला तर मे-जूनमध्ये राज्यपाल म्हणून जाणं असे काँग्रेसमध्ये अनेक बहाद्दर आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तर जेलमध्ये जाल

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना माझं सांगणं आहे. हे सुपारी बहाद्दर ओळखून पक्षातून फेकून द्या. या सुपारी बहाद्दरांना आपण जर आवरलं नाहीतर तुम्ही जेलमध्ये जालं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

News Title – Prakash Ambedkar Statement About Mallikarjun Kharge

महत्त्वाच्या बातम्या

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

‘अशा’ व्यक्तींचा सल्ला कधीच ऐकू नका, जीवनाचा होईल सर्वनाश!

‘आधी ते डिलीट कर’, सलमान खान चांगलाच भडकला; व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या उमेदवारीवरुन मोठा संघर्ष?, फडणवीस आणि तावडे आमने-सामने!

“ज्या गां**ना जायचं आहे त्यांनी जा, त्या अनाजी पंथ देवेंद्र फडणवीसाकडे”