धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadanvis Nagpur | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये सोहळे, मेळावे तसेच इतर कार्यक्रम घेताना दिसत आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरमध्ये (Devendra Fadanvis Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. 8 मार्चला नागपुरमध्ये बांधकाम कामगारांसाठी भाजपने शिबीराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या शिबीराच्या कार्यक्रमामध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.

फडणवीस यांच्या नागपुरमध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू

बांधकाम कामगारांसाठी हे शिबीर नागपूर (Devendra Fadanvis Nagpur) येथे आयोजित केलं असून येथे काही वृद्ध महिला बेशुद्ध पडल्या असून एका वृद्ध महिलेचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर 8 ते 10 वृद्ध महिला जखमी झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये घडला.

मनूबाई तुळशीराम राजपूत असं मृत 65 वय वर्षिय महिलेचं नाव आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत कार्यक्रम भाजपतर्फे ठेवण्यात आला होता. यातून स्वयंपाकघर आणि आवश्यक इतर सामानाच्या वितरणातील शिबीर आयोजित करण्यात आले. (Devendra Fadanvis Nagpur)

वृद्ध महिलांची चेंगराचेंगरी

हा शिबीर 8 मार्चला सकाळी 10 वाजता घेण्यात आला. त्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून सुरेश भट सभागृहाबाहेर लाभार्थ्यांची गर्दी जमली होती. त्यानंतर सभागृहामध्ये जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली होती. त्यामुळे लाभार्थी वृद्ध महिला खाली पडल्या. यामुळे वृद्ध महिलांची चेंगराचेंगरी झाली.

वृद्ध महिला मनूबाई खाली पडल्या. यावेळी काही वृद्ध महिला देखील पडल्या. त्यावेळी त्यांच्या अंगावरती काही महिला पडल्याने मनूबाई जखमी झाल्या आहेत. त्यावेळी त्यांना मेडिकल रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं पण तोवर त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

काही महिला जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून विरोधक यावर कोणती प्रतिक्रिया देतील हे पाहणं गरजेचं असणार आहे.

News Title – Devendra Fadanvis Nagpur In Old lady Death News

महत्त्वाच्या बातम्या

‘अशा’ घरात नेहमी असतो लक्ष्मीचा वास!

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

‘अशा’ व्यक्तींचा सल्ला कधीच ऐकू नका, जीवनाचा होईल सर्वनाश!

‘आधी ते डिलीट कर’, सलमान खान चांगलाच भडकला; व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या उमेदवारीवरुन मोठा संघर्ष?, फडणवीस आणि तावडे आमने-सामने!