राज्यात उन्हाचा कडाका वाढला! पुढील 4-5 दिवसांत…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maharashtra Weather Update | राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये अनेक बदल होत आहेत. काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी कडक ऊन जाणवत आहे. तर, रात्रीला थंड वारे वाहत आहेत. हवमान चक्राच्या (Maharashtra Weather Update) बदलामुळे ऐन हिवाळ्यात आता पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे.

सततच्या वातावरणीय बदलामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. हवामान विभागाने देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये येत्या 11 ते 14 मार्चदरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी बर्फवृष्टीचा देखील इशारा दिला आहे.

मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरण

महाराष्ट्रमध्ये काही ठिकाणी अजूनही ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात अंशतः ढगाळ हवामान होत असून, उन्हाचा चटका वाढल्याने घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाडा वाढल्याने बाहेर पडायलाही त्रास होत आहे.

देशातील ‘या’ भागात पाऊस पडणार

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जम्मू आणि काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. यासोबतच पश्चिम बंगाल, ओडिशा आणि सिक्कीममध्ये हलका पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात वातावरण कसे असणार?

आज (10 मार्च)राज्यात (Maharashtra Weather Update) उन्हाचा चटका कायम राहणार असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात कमाल तापमान 38 तर इतर शहरांत 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान 36 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर पुण्यामध्ये कमाल तापमान 37 तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

येत्या 48 तासामध्ये राज्यातील वातावरण निरभ्र राहणार आहे. 12 तारखेनंतर किमान तापमान मध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे व त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात एक ते दोन डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

News Title : Maharashtra Weather Update news 

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल