ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!

Bajrang Punia | आगामी काळात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत असलेला भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा धक्का बसला आहे. तो पात्रता फेरीत पराभूत झाल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. त्याला पात्रता फेरीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेत्या बजरंगने रशियात कठोर प्रशिक्षण घेतले होते. पण तो पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि संतापला.

पराभवामुळे संतप्त झालेल्या बजरंगने अखेरचा सामना न खेळताच घर गाठले. फ्रीस्टाईल 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत रोहित कुमारने बजरंगचा 1-9 असा पराभव केला. या पराभवानंतर बजरंग पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण त्याला चाचण्यांमध्ये तिसऱ्या-चौथ्या स्थानासाठी सामना खेळायचा होता.

ऑलिम्पिकचे तिकीट गमावले

मात्र, उपांत्य फेरीतील दारूण पराभवानंतर बजरंग पुनियाने थेट घर गाठले. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध नव्हता. उपांत्य फेरीतील पराभवानंतर बजरंगने रागाच्या भरात भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्र सोडले. इतकेच नाही तर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या (नाडा) अधिकाऱ्यांनी त्याचा डोप चा नमुना घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्याकडेही बजरंगने दुर्लक्ष केले.

बजरंगशिवाय रवी दहिया देखील पराभूत झाला आहे. बजरंग आणि रवीने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले होते. मात्र, यावेळी पात्रता फेरीतच पराभूत झाले आहेत. पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाईल वजनी गटात बजरंगला रोहित कुमारविरुद्ध 1-9 असा पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि रवी दहिया यांच्या रूपात भारताला मोठा झटका बसला आहे.

Bajrang Punia चा पराभव

दोन्ही कुस्तीपटू तीन महिन्यांनी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडले आहेत. रविवारी आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीत दोघांना पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर ते पॅरिसमध्ये सहभागी होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडले. दुखापतीतून परतल्यानंतरही रवी दहिया छाप पाडू शकला नाही.

दरम्यान, रवी दहियाला त्याच्या दुसऱ्या सामन्यात उदितविरुद्धच्या चाचण्यांमध्ये दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या चाचण्यांमधील विजेत्यांना आशियाई आणि जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. आशियाई कुस्ती स्पर्धा 11 ते 16 एप्रिल दरम्यान, तर आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा 19 ते 21 एप्रिल दरम्यान होणार आहे.

News Title- Wrestler Bajrang Punia will miss Paris Olympics after losing Olympic trials
महत्त्वाच्या बातम्या –

धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

‘खरंतर लक्ष्यानेच स्वतःचं आयुष्य स्वतः संपवलं…’; भावाने केला अत्यंत धक्कादायक खुलासा

“तो सारखा घरी यायचा, एकदा तर…”, रिंकू राजगुरुने सांगितला धक्कादायक किस्सा

“तुमचा नवरा सारखा मोदी-मोदी करत असेल तर…”; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

सुप्रिया सुळे-अजित पवार एकाच मंचावर, सुळेंचा सवाल आणि त्यावर पवारांची टोलेबाजी!