“तुमचा नवरा सारखा मोदी-मोदी करत असेल तर…”; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Arvind Kejriwal | आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपासह इतर पक्षांच्या सभांचेही सत्र आता सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष (Arvind Kejriwal ) आणि भाजपने दिल्लीतील उमेदवारांची घोषणा केली आहे.

दिल्लीमधील सात जागांसाठी पक्षांमध्ये जोरदार लढत होणार आहे. दिल्लीत पक्षांच्या प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. आप पक्षाचा महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याकडे अधिक कल असल्याचे या सभामधून दिसतंय.

अशाच एका सभेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. अरविंद केजरीवाल यांनी महिलांना एक अजब सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत केजरीवाल यांनी हा सल्ला दिला आहे. त्यामुळे याची एकच चर्चा रंगली आहे.

अरविंद केजरीवाल यांचा महिलांना अजब सल्ला

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी पतीला मनवण्याचा एक अजब फॉर्म्युला महिलांना सांगितला आहे. “तुमचा नवरा मोदी-मोदी बोलत असेल तर त्याला जेवण  देऊ नका, त्याला डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगा, यानंतर प्रत्येक पतीला आपल्या पत्नीच्या नियमांचे पालन करावे लागेल,” असं अरविंद केजरीवाल यांनी एका सभेमध्ये म्हटलं आहे.

“महिलांनो आपल्या नवऱ्याला सांगा की,..”

इतकंच नाही तर पुढे ते म्हणाले की, महिलांनो आपल्या नवऱ्याला हे सुद्धा सांगा की, मी त्यांची वीज मोफत केली आहे, त्यांची बसची तिकिटे मोफत केली आहेत आणि आता मी महिलांना दरमहा एक हजार रुपये देत आहे. भाजपने त्यांच्यासाठी काय केलं?,त्यामुळे यंदा ‘आप’लाच मत द्या”, असंही केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी म्हटलं.

दिल्ली सरकारने 2024-25 च्या बजेटमध्ये 18 वर्षांवरील सर्व महिलांना मासिक 1,000 रुपये मानधन देण्याची योजना जाहीर केल्यानंतर महिलांशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमामध्ये केजरीवाल यांनी हा अजब सल्ला दिला.

News Title : Arvind Kejriwal strange advice to women

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल