सुप्रिया सुळे-अजित पवार एकाच मंचावर, सुळेंचा सवाल आणि त्यावर पवारांची टोलेबाजी!

Supriya Sule | राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आता दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेत भाजपचा हात धरला आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे दोन्ही गटाकडून सतत एकमेकांवर निशाणा साधला जातो. अशातच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकाच मंचावर आल्याचे दिसून आले.

या मंचावर दोघेही भाऊ-बहीण एकमेकांना काहीच थेट बोलले नाही. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या सवालाला अजित पवारांनी मंचावरूनच उत्तर देत टोलेबाजी केली. दोघांमधली अंतर्गत दुफळी यामुळे दिसून आली. दोघांनी एकमेकांशी थेट बोलणं जरी टाळलं असलं तरी भाषणातून त्यांच्यात सवाल-जवाब रंगल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यामध्ये महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसंच सुप्रिया सुळे उपस्थित होते. यात अगोदर सुप्रिया सुळे यांना भाषणाची संधी देण्यात आली. त्यांनी भाषणातून केलेल्या प्रश्नावर लागलीच अजित पवारांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“माझी शासनाकडे मागणी आहे की, या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून नगरसेवक नाहीयेत. गेल्या दोन-अडीच वर्षांत इथे निवडणूक न झाल्यामुळे या भागातल्या जनतेनं कुणाकडे प्रश्न मांडावेत? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी नगरसेवकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे नगरसेवकांची निवडणूक आपण लवकरात लवकर घेतली, तर या भागातल्या लोकांना मोठा आधार मिळेल”, अशी मागणी यावेळी सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

अजित पवारांचे मंचावरूनच थेट प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे यांच्या मागणीला अजित पवार यांनी लगेच आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिले. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ महानगर पालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. पण त्या सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या आहेत. आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी असं आम्हालाही वाटतं.

सर्वोच्च न्यायालयात ओबीसी संदर्भातला मुद्दा चालू आहे. आता त्यावर निकाल लवकर लागत नाहीये. राज्य सरकार सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात याच मताचं महायुतीचं सरकार आहे याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना टोला लगावला.

News Title- Ajit Pawar and Supriya Sule In Pune  

महत्त्वाच्या बातम्या –

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल