मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, इतर संघांचं वाढलं टेन्शन!

IPL 2024 | आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये (IPL 2024) मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्या असणार आहे. यामुळे बराच काळ वादही रंगला.

चाहत्यांनी देखील मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. नीता अंबानी यांच्या या निर्णयामुळे सोशल मिडियावर बराच गदारोळ झाला. सोशल मिडियावर संघाचे फॉलोवर्स झटक्यात कमी झाले. आता मुंबई इंडियन्स संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

नुवान तुषाराची हॅटट्रिक

MIचा भाग असलेल्या एका खेळाडूने आपल्या देशासाठी एका टी-20 सामन्यात दमदार कामगिरी करत हॅटट्रिक घेतली आहे. हा खेळाडू दूसरा कुणी कोणी नसून नुवान तुषारा आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात नुवान तुषाराने हा पराक्रम केला आहे.

29 वर्षीय वेगवान गोलंदाज तुषाराने बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो आणि तौविद हृदोय यांना बॅक-टु-बॅक चेंडूवर बाद केले. त्यानंतर अनुभवी महमुदुल्लाहला एलबीडब्ल्यू बाद करून कारकिर्दीची पहिली हॅट्ट्रिक पूर्ण केली.

नुवान तुषारा मुंबई इंडियन्सकडून खेळणार

नुवान तुषाराने शोरीफुल इस्लामला बाद करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले 5 बळी घेतले आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला. नुवानच्या या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला प्रचंड आनंद झाला आहे. आता नुवान आयपीएलमध्ये (IPL 2024) कसा खेळणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आयपीएल 2024 च्या लिलावात तब्बल 4.2 कोटी रुपयांना मुंबई इंडियन्सने तुषाराला संघात घेतले. यासोबतच आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सने दिलशान मदुशंकाला 4.6 कोटी रुपयांना आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झीला 5 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

News Title : IPL 2024 Mumbai Indians player Nuwan Tushara hat trick

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल