सीमा हैदरच्या अडचणीत वाढ, नवऱ्याकडून तब्बल इतक्या कोटी रुपयांची मागणी

Seema Haider | सीमा हैदर (Seema Haider) ही पाकिस्तानी विवाहित महिला आहे. भारतातील सचिन नावाच्या मुलासोबत पबजी गेम खेळताना तिची मैत्री झाली. त्यानंतर त्या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्यानं ती भारतामध्ये आली. नेपाळ मार्गे ती आपल्या चार मुलांना सोबत घेत भारतात आली. काही महिन्यांपूर्वी जिकडे तिकडे सीमा हैदरचीच (Seema Haider) चर्चा पाहायला मिळत होती. आता पुन्हा एकदा तिच्या अडचणीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

11 कोटी रूपयांची मागणी-

सीमा हैदर (Seema Haider) ही नेपाळमार्गे भारतामध्ये आली. त्यानंतर तिनं आपला प्रियकर सचिनसोबत हिंदू पद्धतीनं विवाह केला. मात्र आता या विवाहावर सीमाचा पाकिस्तानातील पहिला पती गुलाब हैदरने सीमाला (Seema Haider) आणि तिचा सध्याचा पती सचिनला नोटीस बजावली असून त्या नोटीसमध्ये त्यांनी तब्बल 11 कोटी रूपये द्यावे, अशी मागणी केली आहे.

सीमा हैदर आणि पती सचिनला नोटीस-

सीमाने गुलाब हैदरशी म्हणजेच तिच्या आधीच्या पतीकडून घटस्फोट न घेता सचिनसोबत दुसरं लग्न केलं आहे. तसेच तिच्या चारही मुलांना अल्पवयातच धर्मांतर केल्याप्रकरणी सीमाने गुन्हा केला असल्याचं त्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. हरियाणातील वकील मोमीन मलिक यांच्या मार्फत सीमा हैदरला नोटीस पाठवली आहे.

सीमा हैदरचा भाऊ वकील एपी सिंह यांना 5 कोटी, तर सीमा हैदर आणि पती सचिनला 3-3 कोटी रूपये मानहानीची नोटीस पाठवली. या तिघांनीही दंडाची रक्कम जमा करावी, अन्यथा माफी मागावी असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मुलांचा धर्म कसा बदलला?

सीमाच्या पहिल्या पतीने आपल्या अल्पवयीन मुलांचे धर्मांतर कसं केलं?, असा प्रश्न केला आहे. कायद्यानुसार एखाद्या मुलाचे धर्मांतर करायचं असल्यास त्याची त्या मुलांना माहिती असावी. यामध्ये मुलांच्या वडिलांचा निर्णय फार महत्त्वाचा आहे. हा निर्णय का घेण्यात आला नाही? असा सवाल आता वकिलाने नोटीसमध्ये केला आहे.

आपल्या चार मुलांचं धर्मांतर करणं हे चुकीचं असल्याचा दावा सीमाच्या पहिल्या पतीने नोटीसमध्ये केला आहे. तिने आपल्या मुलांचे अल्पवयातच धर्मांतर केलं. त्यासाठी सीमा हैदर आणि तिचा पती सचिनने माफी मागावी अन्यथा त्यांनी 11 कोटी रूपये द्यावेत, असं त्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title – Seema Haider Ex Husband Demand 11 Crored Rupees

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

अश्विनची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जे कोणी करून दाखवलं नाही ते केलं

जय शहा यांची मोठी घोषणा, कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस

‘पैशांसाठी राज कुंद्रासोबत लग्न केलं?’, शिल्पा शेट्टीचं ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर

बारामतीत नणंद भाऊजय यांची गळाभेट, व्हिडीओ व्हायरल