अखेरच्या चेंडूवर सनसनाटी निर्णय! 1 धाव अन् बरेच काही; स्मृतीसह खेळाडूंचे डोळे पाणावले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

WPL 2024 | महिला प्रीमिअर लीगचा दुसरा हंगाम अंतिम टप्प्याकडे कूच करत आहे. दुसऱ्या सत्रातील सर्वात रोमांचक सामन्यांमध्ये जर कोणता एक संघ सहभागी झाला असेल तर तो म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत झाली. गेल्या हंगामातील उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला या हंगामातील पहिल्याच सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच्यानंतर आणखी एका सामन्यात त्यांना अवघ्या 1 धावांनी पराभव पत्करावा लागला.

मात्र, रविवारी काहीसे उलट झाले अन् मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 1 धावांनी सनसनाटी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सला या मोसमात दोनदा शेवटच्या क्षणी हृदयद्रावक पराभवाला सामोरे जावे लागले. खरं तर यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात मुंबईने शेवटच्या चेंडूवर दिल्लीला पराभूत केले होते, तर आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी यूपीविरुद्ध 1 धावाने दिल्लीला पराभव स्वीकारावा लागला होता.

स्मृतीसह खेळाडूंचे डोळे पाणावले

रविवारी दिल्लीने बंगळुरूविरूद्धच्या सामन्यातून आपल्या पहिल्या दोन पराभवांचा बदला घेतला असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. कारण यूपी आणि मुंबईकडून पराभूत झाल्यानंतर तसाच पराभव दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा केला. रविवारी 10 मार्च रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी आणि दिल्ली यांच्यात सामना खेळवला गेला, ज्यामध्ये दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 181 धावांची मजबूत धावसंख्या उभारली.

गेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सविरुद्धचे 139 धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरलेल्या दिल्लीची फलंदाजी यावेळी दमदार होती. दिल्लीकडून शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंग या सलामीच्या जोडीने पॉवरप्लेमध्येच 50 धावा पूर्ण केल्या होत्या. दिल्लीने दिलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने दमदार कामगिरी केली.

 

WPL 2024 चा थरार

प्रत्युत्तरात बंगळुरूने दुसऱ्याच षटकातच कर्णधार स्मृती मानधनाची विकेट गमावली होती. असे असूनही संघाने वेगाने धावा काढल्या. एलिस पेरीने धावांचा पाऊस पाडला. तिला सोफी मोलिनोचीही चांगली साथ मिळाली आणि दोघींमध्ये 80 धावांची भागीदारी झाली. पण अशातच पेरी धावबाद झाली आणि बंगळुरूचा डाव फसला. मात्र, रिचा घोष आणि सोफी डिव्हाईन यांनी मोर्चा सांभाळला.

142 धावांवर आणखी एक विकेट पडल्यानंतर रिचा घोषने संघाला विजयाच्या जवळ नेले. अखेरच्या षटकात बंगळुरूला 17 धावांची गरज होती. रिचाने पहिल्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून विजयाकडे कूच केली. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज होती पण रिचाने जेस जोनासनचा चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात मारला. क्षेत्ररक्षकाचा थ्रो थेट जोनासनच्या हातात आला, त्यामुळे रिचा धावबाद झाली आणि संघाने 1 धावेने सामना जिंकला. तोंडचा घास निसटताच रिचा घोष भावूक झाली. तसेच कर्णधार स्मृती मानधनासह आरसीबीच्या शिलेदारांचे डोळे पाणावले.

News Title- Richa Ghosh and Smriti Mandhana get emotional as Delhi Capitals beat Royal Challengers Bangalore by 1 run in WPL 2024
महत्त्वाच्या बातम्या –

फक्त एका कारणामुळे TMC ने युसूफ पठाणला तिकीट दिलं; बड्या नेत्याविरूद्ध मैदानात!

ऑलिम्पिकचं तिकीट गमावताच कुस्तीपटू बजरंग पुनियाचं धक्कादायक कृत्य!

धक्कादायक! अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

‘खरंतर लक्ष्यानेच स्वतःचं आयुष्य स्वतः संपवलं…’; भावाने केला अत्यंत धक्कादायक खुलासा

“तो सारखा घरी यायचा, एकदा तर…”, रिंकू राजगुरुने सांगितला धक्कादायक किस्सा